भाजप प्रदेशाध्यक्ष वरुडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:18+5:302021-09-02T04:28:18+5:30

कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन फोटो - खासबागे ०१ पी वरूड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ...

BJP state president in Varuda | भाजप प्रदेशाध्यक्ष वरुडात

भाजप प्रदेशाध्यक्ष वरुडात

कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन

फोटो - खासबागे ०१ पी

वरूड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचे वरूडमध्ये स्वागत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. त्यांनी शक्ती आणि बूथ प्रमुखांना पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सकाळी १० वाजता वरूड येथे इंदिरा चौक येथे स्वागत करण्यात आले. भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष नितीन गुजर व तालुकाध्यक्ष हितेश तडस यांच्या नेतृत्वात युवा वॉरिअरच्या शाखेचे उद्घाटन त्यांनी केले. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी शहर व तालुक्याच्यावतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला. येथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी खा. रामदास तडस, आ. प्रताप अडसड, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे (चौधरी) यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आघाडी मोर्चामधील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP state president in Varuda