मारण्याची, मरण्याची भाषा भाजपाने आमच्याशी करू नये : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:04 IST2017-06-10T00:04:13+5:302017-06-10T00:04:13+5:30

मरण्याची आणि मारण्याची भाषा भाजपने आमच्याशी करू नये, वेळ आलीच तर शेतकरीहितासाठी बच्चू कडू शहीद होण्यासाठीही तयार आहे,....

BJP should not try to kill us, to kill us: Bachu Kadu | मारण्याची, मरण्याची भाषा भाजपाने आमच्याशी करू नये : बच्चू कडू

मारण्याची, मरण्याची भाषा भाजपाने आमच्याशी करू नये : बच्चू कडू

अमरावती : मरण्याची आणि मारण्याची भाषा भाजपने आमच्याशी करू नये, वेळ आलीच तर शेतकरीहितासाठी बच्चू कडू शहीद होण्यासाठीही तयार आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी भाजपच्या आरोपांवर ‘लोकमत’शी बोलताना दिली.
इंग्रज सरकारला जनतेचा आवाज ऐकू जात नव्हता, त्यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगतसिंगांनी आवाज करणारा बॉम्ब फोडला होता. तो बॉम्ब हिंसेचा नव्हता, आक्रोशाचा होता. शेतकऱ्यांच्या वेदना शासनाला ऐकू जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हीही तसाच आक्रोशाचा बॉम्ब फोडू, असे विधान मी केले होते. नाशकात दीडशे शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे नोंदविले आहे. शेतकरी दरोडेखोर झाले तरी कधी, याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. काल लाठीमारात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. एमपीत शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. शासन जनरल डायरप्रमाणे वागत आहे. शेतकऱ्यांनी मोर्चे काढू नये काय, आंदोलने करू नये काय, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. १३ तारखेच्या ‘रेल रोको’ आंदोलनात व्यापक सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

Web Title: BJP should not try to kill us, to kill us: Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.