आमला ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा

By Admin | Updated: May 20, 2015 01:11 IST2015-05-20T01:11:36+5:302015-05-20T01:11:36+5:30

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या आमला विश्वेश्वरच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक रविवारी पार पडली.

BJP flag on Amla gram panchayat | आमला ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा

आमला ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा

चांदूररेल्वे : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या आमला विश्वेश्वरच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक रविवारी पार पडली. सरपंचपदी रजनी ज्ञानेश्वर मालखेडे व उपसरपंचपदी रामेश्वर भीमराव किरणापुरे अविरोध निवडून आले. यावेळी भाजपाने आमला विश्वेश्वर ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे.
सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी रजनी ज्ञानेश्वर मालखेडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्या अविरोध निवडून आल्यात. उपसरपंचपदाच्या निवडणुकीतून दत्तात्रेय बाबुप्रसाद दुबे यांनी माघार घेतल्यामुळे रामेश्वर भीमराव किरणापुरे हे अविरोध निवडून आले. भाजपप्रणित आदर्श ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी १० जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.
यावेळी ग्रा. पं. सदस्य राजेश पखाले, माधुरी सतीश वासनकर, विलास बकाले, उज्ज्वला एकनाथ घोडमारे, वीरेंद्र बकाले, अर्चना राहुल काळबांडे, कल्पना प्रमोद केने, विनोद नागरीकर, शैला विजय डोंगरे, अन्नपूर्णा रामराव उईके, दत्तात्रेय दुबे उपस्थित होते. निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून एस. यू. भांडे, ग्रामविकास अधिकारी के. जी. देशमुख यांनी काम पाहिले. निवडणुकीच्या विजयात पंचायत समिती सदस्य नीलिमा होले, विद्यासागर होले, अरविंद बकाले, रमेश बकाले, किशोर मालखेडे, माजी सरपंच माणिकराव केने, माजी प्राचार्य हरगोविंद होले, प्रल्हादराव बकाले, माणिकराव महाराज, प्रशांत घाटोळ, नरेंद्र नाल्हे, मनोहर पाचपोर, विनोद बकाले, प्रवीण बकाले, अविनाश बकाले, आखरे गुरुजी, शालिग्राम नागरीकर, सचिन होले, संतोष कळमकर, युवराज डांगे, हर्षल बकाले, संजू बकाले, सविता पेंदाम, पुष्पा नागोसे, विजय शिरपूरकर, देवीदास गहुकार यांच्यासह अनेकांचा मोलाचा वाटा आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP flag on Amla gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.