पक्षिथांबे करतील तूर पिकावरील अळ्यांचा नायनाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:44+5:302020-12-17T04:39:44+5:30

भातकुली - चार दिवसांपासून आकाशात मिरविणाऱ्या ढगांमुळे ल्रीच्या बहरलेल्या व हरभऱ्याच्या फुलावर येऊ घाटलेल्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची भीती ...

The birds will stop the larvae on the turf crop | पक्षिथांबे करतील तूर पिकावरील अळ्यांचा नायनाट

पक्षिथांबे करतील तूर पिकावरील अळ्यांचा नायनाट

भातकुली - चार दिवसांपासून आकाशात मिरविणाऱ्या ढगांमुळे ल्रीच्या बहरलेल्या व हरभऱ्याच्या फुलावर येऊ घाटलेल्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. या अळ्यांच्या बंदोबस्तासाठी शेतात पक्षिथांबे उभारण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची अंडी व पहिली अळी अवस्था दिसून येत आहे. हरभरा पीक आठ ते दहा दिवसानंतर फुलोरा अवस्थेत येईल. त्यावर ढगाळ वातावरणामुळे घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता राहील. तुरीचे शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग व शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने नुकसान होण्याची शक्यता आहे. याकरिता तूर व हरभरा पिकाच्या उंचीपेक्षा थोडे अधिक उंचीवर पक्षिथांबे उभारावेत. एक उभी व त्यावर आडवी काठी बांधून विनाखर्चाचे पक्षिथांबे तयार करता येतात. याशिवाय हेक्टरी १० कामगंध सापळे लावावे. या सापळ्यांमध्ये सतत तीन दिवस ८ ते १० नर पतंग निंबोळी अर्क ५ टक्के, दशपर्णी अर्क यासारख्या घरगुती कीटकनाशकांची पहिली फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले.

किडींची नुकसान पातळी ओलांडल्यास तूर पिकाकरीता वलोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ मि.लि. किंवा इंडॉक्झीकार्द १५.८ टक्के ईसी. ६.६ मि.ली. किंवा लेंब्डा सायहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रवाही १० मि.ली किंवा फल्युवेंडामाईड २० टक्के डब्ल्युजी ५ ग्रॅम किंवा इमामेक्टीन बैंन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल ९.3० लॅब्डा सायहँलोमेश्रीन ४.६० झेडसी ४ मिली प्रती १०टूर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच हरम-यावरील घाटे अळीसाठी क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी. २० मिली. किंवा इमामेक्टीन मेंन्झोएट ५ टक्के एराजी ३ ग्रॅम किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी. २५ मिलि किंवा फल्युबेंडामाईड २० टक्के डब्ल्यूपी ५ मिली. किंथा क्लोरॅनट्रॅनीलिपोल १८.५ टक्के एस.सी. २.५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी व आवश्यकता भारल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. कीटकनाशकांची फवारणी करतांना शिफारशीत मात्रेतच फवारणी करावी अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: The birds will stop the larvae on the turf crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.