ठाणेदारांकडून पक्ष्यांची तृष्णातृप्ती

By Admin | Updated: April 24, 2017 00:47 IST2017-04-24T00:47:58+5:302017-04-24T00:47:58+5:30

पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी राजापेठ ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. एकता मित्र मंडळांनी पुरविलेले ५० पॉट ठाण्याच्या आवारात लावून त्यांनी पक्षांची तृष्णातृप्ती केली.

Birds of the caste from the Thane | ठाणेदारांकडून पक्ष्यांची तृष्णातृप्ती

ठाणेदारांकडून पक्ष्यांची तृष्णातृप्ती

एकता मित्र मंडळाचा पुढाकार : ५० ठिकाणी सुविधा
अमरावती : पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी राजापेठ ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. एकता मित्र मंडळांनी पुरविलेले ५० पॉट ठाण्याच्या आवारात लावून त्यांनी पक्षांची तृष्णातृप्ती केली.
उन्हाळ्यात मानवी जीवनच होरपळून निघते, अशा स्थितीत पक्षांचेही पाण्याअभावी मृत्यू होतात. निसर्गाचे संतुलन राखण्यात पक्ष्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनाही सुरक्षितता मिळावी, यासाठी वन्यप्रेंमी झटतात. राजापेठ ठाण्याचे ठाणेदार किशोर सुर्यवंशी यांनी पक्षीप्रेमातून ठाण्याच्या परिसरात पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे. एकता मित्र मंडळांतील पदाधिकाऱ्यांनी पुरविलेली पाण्याचे पॉट ठाण्याच्या आवारात लावले. राजापेठ ठाण्याच्या आवारातील झाडावर दररोज हजारो पक्षी वास्तव्यास आहे. ठाणेदार सूर्यवंशींच्या पुढाकाराने एकता मित्र मंडळाचे गौरव लेवटे, आशिष मुल, गणेश तळकांडे, आकाश कडूकार, अक्षय चाम्बंटकर, साहील डिक्याव, अभिजित दानी यांनी वृक्षांवर पाण्याचे पॉट लावून पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे.

Web Title: Birds of the caste from the Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.