शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

लोकशाहीर अण्णाभाऊंचे जीवनचरित्र अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:48 AM

Amravati News Amravati University संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट केले जाणार आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट केले जाणार आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी याविषयी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाला शनिवारी माहिती दिली. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने २९ जुलै २०२० रोजी बैठकीद्धारे अमरावती विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट करण्यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन सादर केले होते. सिनेट सदस्य मनीष गवई यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी पत्रव्यवहार केला. अण्णाभाऊंचे जीवनचरित्र अभ्यासक्रमात समावेश करण्यात आले नाही तर आंबेडकरी जनता तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हा विषय मराठी अभ्यास मंडळाच्या सभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी उशिरा का होईना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊंचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. कुलगुरू चांदेकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने स्वागत केले. त्यांचा सत्कारदेखील केला.

यावेळी समाधान वानखडे, दादासाहेब क्षीरसागर, गजानन वानखडे, महादेवराव खंडारे, मनीष गवई, भूषण बनसोड, सुरेश दहिकर, उत्तमराव भैसने, अरूण वानखडे, राजाभाऊ हातागडे, बी.टी. अंभोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र