आठवडी बाजारातून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:23+5:302021-06-17T04:10:23+5:30
अमरावती : बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजार परिसरातून ३० हजार रुपये किंमतीची एमएच २७-सीजे ८२३८ क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपीने ...

आठवडी बाजारातून दुचाकी चोरी
अमरावती : बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजार परिसरातून ३० हजार रुपये किंमतीची एमएच २७-सीजे ८२३८ क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना १४ जून रोजी घडली. या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. उमेश बाबाराव भोयर (४५, रा. गोविंदपुर ता. अमरावती) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
-------------------------------------------------------------
युवकावर चाकूने वार
अमरावती : दारू पिण्याकरिता चलण्यास मनाई केल्यामुळे झालेल्या वादाच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकाच्या दंडावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील रुक्मिणीनगरात मंगळवारी घडली. भारत यादव (रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. ऋषभ गोविंदराव देशमुख (२४, रा. रुक्मिणीनगर) याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.
------------------------------------------------
कार अपघातात दुचाकीस्वार जखमी
अमरावती : कारने धडक दिल्यानंतर दुचाकीने अन्य दुचाकीलासुद्धा भिडली. हा अपघात आशियाड कॉलनी चौकात १४ जून रोजी घडली. याप्रकरणी एमएच२७-बीई ४०७५ क्रमांकाच्या कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी कृणाल अनिलसिंह सावनेर (३५, रा. देशमुख प्लॉट) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.