शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: अमरावतीतून नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार; भाजपकडून उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 19:14 IST

Navneet Rana: लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून नवनीत राणा या भाजपसोबत होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती.

Amravati Lok Sabha ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असून या मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून नवनीत राणा या भाजपसोबत होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. या चर्चेवर अखेर आज शिक्कामोर्तब झालं असून भाजपने राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अमरावतीतून भाजपच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीतील घटकपक्षांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राणा यांना उमेदवारी दिल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला होता. तसंच नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काल मुंबईत येत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. या नेत्यांमध्ये प्रवीण पोटे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण महल्ले, निवेदिता चौधरी, चेतन पवार, किरण पातुरकर आणि रवींद्र खांडेकर यांचा समावेश होता.  मात्र हा विरोध झुगारत भाजप नेतृत्वाने नवनीत राणा यांच्यावर विश्वास दाखवत आज त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. 

बच्चू कडू काय म्हणाले होते?

नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात हल्लाबोल करत बच्चू कडू यांनी म्हटलं होतं की, "मतदारसंघात आमची ताकद असतानाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. उलट महायुतीच्या संभाव्य उमेदवाराकडून आमच्याच कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही या जागेवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक चांगला उमदेवार मिळाला असून ६ एप्रिल रोजी आम्ही या उमेदवाराची घोषणा करू. हा उमेदवार भाजपमधीलच आहे," असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला होता.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाamravati-pcअमरावतीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४