वलगावच्या स्टेट बँकेसमोर तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:05+5:30
वलगाव येथील स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, कुणावरही कारवाई केली जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, येथे बाहेरून लोक येतात आणि कुठेही थुंकतात. आमच्या आरोग्यालादेखील त्यांच्यामुळे धोका असल्याने परिसर सॅनिटाइज करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी संतोष रावेकर यांनी दिली.

वलगावच्या स्टेट बँकेसमोर तोबा गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असताना वलगावात स्टेट बँकेसमोर पैसे काढण्यासाठी हजारो लाभार्थींची गर्दी दिसून आली. लॉकडाऊनचे उल्लंघन होत असताना, स्थानिक पोलीस, बँक व्यवस्थापन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
बँकेने सुरक्षा पुरविण्याबाबतचे पत्र वलगाव पोलीस ठाण्याला दिल्याचे सांगितले. तेथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, बुधवारी शासनाचे सर्व नियम दावणीला बांधत अंदाजे एक हजार नागरिक एकमेकांना खेटून रांगेत उभे होते.
कारवाई व्हावी