तिवसा येथे भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; ५३ प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:01 IST2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:01:00+5:30
तिवसा तालुक्यातील भारवाडी फाट्यानजीक हा अपघात शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. सीजी ०४ एनए १८७६ क्रमांकाची ट्रॅव्हलर बस अमरावतीहून नागपूरला ५३ प्रवासी निघाली होती. मार्गातील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने भारवाडीनजीक असलेल्या हॉटेल आनंदसमोर मागून जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हलर बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले.

तिवसा येथे भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; ५३ प्रवासी बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसने एका ट्रकला मागून जबर धडक दिल्यानंतर ती रस्त्याच्या खाली उतरली. सुदैवाने यात प्रवास करणारे सर्व ५३ प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र, चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता अमरावती हलविण्यात आले आहे.
तिवसा तालुक्यातील भारवाडी फाट्यानजीक हा अपघात शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. सीजी ०४ एनए १८७६ क्रमांकाची ट्रॅव्हलर बस अमरावतीहून नागपूरला ५३ प्रवासी निघाली होती. मार्गातील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने भारवाडीनजीक असलेल्या हॉटेल आनंदसमोर मागून जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हलर बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले. चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने ५३ प्रवासी या अपघातात थोडक्यात बचावले. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व अपघाताची नोंद घेतली.