इच्चक विकृत कोश्यारी नका करू हुशारी; अमरावतीत राज्यपालांचा प्रतिकात्मक उलटा पुतळा लटकवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 13:55 IST2022-11-30T13:25:03+5:302022-11-30T13:55:42+5:30
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार निषेध

इच्चक विकृत कोश्यारी नका करू हुशारी; अमरावतीत राज्यपालांचा प्रतिकात्मक उलटा पुतळा लटकवून आंदोलन
मनीष तसरे
अमरावती : एकमेकांच्या राजकीय नेत्यांवर, आदर्श व्यक्तींवर केलेल्या टीकेवरून राज्यात आधीच वातावरण तापलं होतं. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. अमरावतीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार निषेध करण्यात आला.
अमरावतीच्या पंचवटी चौकातील उड्डाणपुलाजवळ राज्यपाल कोश्यारी यांचा प्रतिकात्मक उलटा पुतळा लटकवून चपला व लाठ्या काठ्यांनी बडवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाप्रकरणी राज्यपाल कोश्यारी त्यांच्या विरोधात अमरावतीत ठाकरे गटांनी जोरदार आंदोलन केले.
भाजप नेत्यांनो विकृत इच्चक कोश्यारी यालाही गुजरातला घेऊन जा, अशा आशयाचे बॅनरसुद्धा लावण्यात आले. तर, उड्डानपुलाला राज्यपालांचा उलटा प्रतिकात्मक पुतळा लावून चप्पल व लाठ्यांनी बडवण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार अशा घोषणाबाजीसुद्धा देण्यात आल्या.