वाहन चोरट्यांनो सावधान; शॉक सिस्टिम आली आहे!
By Admin | Updated: July 27, 2014 23:30 IST2014-07-27T23:30:25+5:302014-07-27T23:30:25+5:30
कधी तुमचे दुचाकी वाहन चोरी गेली आहे का? मग ती शोधायला किती मेहनत घ्यावी लागली असेल. पण ते जाऊ दे धावपळ केल्यानंतरही वाहन मिळाले नाही तर! आता ही चिंता करण्याची आवश्यकता नाही.

वाहन चोरट्यांनो सावधान; शॉक सिस्टिम आली आहे!
अमरावती : कधी तुमचे दुचाकी वाहन चोरी गेली आहे का? मग ती शोधायला किती मेहनत घ्यावी लागली असेल. पण ते जाऊ दे धावपळ केल्यानंतरही वाहन मिळाले नाही तर! आता ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण शहरातील एका हौशी युवकाने चोरावर शिरजोर होत एक असा ट्रॅकर तयार केला आहे, जो तुमच्या वाहनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल त्याला ४४० तर नाही पण ३०० व्होल्टेजचा झटका मात्र बसणार आहे.
नवसारी मार्गावरील हर्षराज कॉलनी परिसरातील एकवीरा विद्युत कॉलोनीत राहणाऱ्या अमित थेर या धडपड्या विद्यार्थ्याला, असे आविष्कार तयार करण्याचा छंद आहे. लहानपणापासूनच त्याने याची जोपासना केली आहे. त्यामुळेच वयाच्या २४ व्या वर्षांत या उंबरठ्यावर त्याने चोरट्यांना धडा शिकविण्याचा मानस बाळगला आहे. अमित हा बीएससी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असून पुणे येथे शिक्षण घेत आहे.
अमित थेरने ‘लोकमत’शी बोलताना आपल्या आविष्काराची माहिती दिली. तो म्हणाला की, त्याने गाडीच्या चाकाला एक शॉक सिस्टिम लावली आहे.
जी थेट बॅटरीशी जुडलेली आहे. या सिस्टिममध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट लावण्यात आले आहे. जे ३०० व्होल्टपर्यंत पॉवर सप्लाय करते. जर कोणी व्यक्ती ही ट्रॅकर सिस्टीम लावलेले वाहन चोरण्यासाठी त्याला हात लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला काही सेकंदातच इलेक्ट्रिक शॉक लागेल आणि तो काही क्षणासाठी बेशुध्ददेखील होऊ शकतो. म्हणजे तुमचे वाहनही बचावले आणि चोराला धडा शिकविला म्हणून चांगले नागरिक असण्याचे कर्तव्यदेखील पूर्ण होईल.
असा होऊ शकतो उपयोग
हे इलेक्ट्रिक सॉकीट फक्त वाहनांसाठीच नाही तर पाण्याच्या टाकीमध्येदेखील उपयोगी पडू शकते. पाण्याच्या टाकीमध्ये हे यंत्र लावल्यानंतर ती पाण्याने पूर्णपणे भरल्यावर यामध्ये आवाज होतो. ज्यामुळे तुम्हाला टाकी ‘फुल्ल’ झाली, हे कळते. शिवाय आपण पाण्याचा अपव्यव पण टाळू शकतो. अशाप्रकारे कुठलेही नकसान रोखण्याच्या उद्देशाने या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करता येणार आहे. तसेच हे यंत्र वापरणे सामान्यांनादेखील शक्य आहे.