शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

सावधान, नैसर्गिक संकटे वाढणार पैशाच्या हव्यासापोटी डोंगरांना सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

दिवसाढवळ्या डोंगर पोखरून  गौण खनिजाची चोरी सुरू आहे. मेळघाटच्या पायथ्याशी पर्यावरणाचा खेळ दररोजच खेळला जात आहे. ज्यांना शासनाने अधिकार दिले, त्यातील काहींचे तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. लालसेच्या छोट्याशा तुकड्यावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. अचलपूर, चिखलदरा तालुक्यांच्या सीमा लागून आहे. मेळघाटच्या डोंगरात गौण खनिज तस्करांचा धिंगाणा अनेक महिन्यांपसून सुरू आहे.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्लोबल वाॅर्मिंगचा धोका टळलेला नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासन करीत आहे. झाडे लावा-झाडे जगवा या मोहिमेत कोट्यवधींची वृक्षलागवड करण्यात येत आहे, तर दुसरीकडे हप्ताखोर कर्मचारी ते अधिकारी पैशांच्या हव्यासापोटी गप्प आहेत. दिवसाढवळ्या डोंगर पोखरून  गौण खनिजाची चोरी सुरू आहे. मेळघाटच्या पायथ्याशी पर्यावरणाचा खेळ दररोजच खेळला जात आहे. ज्यांना शासनाने अधिकार दिले, त्यातील काहींचे तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. लालसेच्या छोट्याशा तुकड्यावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे.अचलपूर, चिखलदरा तालुक्यांच्या सीमा लागून आहे. मेळघाटच्या डोंगरात गौण खनिज तस्करांचा धिंगाणा अनेक महिन्यांपसून सुरू आहे. बोराळा परिसरातील भिलखेडा, गरजदरी, नयाखेडा, जांभळा, सालेपूर पांढरी व इतरही ठिकाणाहून डोंगर पोखरले गेले आहेत. स्टोन क्रशरसाठी परवानगी देऊनही जागा कमी पडली की काय, म्हणून आदिवासींच्या शेतजमिनी सपाटी करण्यासाठी परवानगी दिली गेली. त्यावरील गौण खनिजाचा महसूल शासनाला तर मिळाला नाहीच, मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात किरकोळ रक्कम ओतून तस्करांनी  कोट्यवधी रुपयांची संपत्ती पळविली. अनेक नियम यासाठी धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र आहे. यावर जिल्हा खनिकर्म विभागाने सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे. 

पर्यावरणाचे कोणालाच काही पडले नाहीडोंगररांगा आणि डोंगराचा पायथा हे संवेदनशील आहेत. त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. सातपुड्याच्या दक्षिण पायथ्याशी हा विध्वंस होणे योग्य नाही. महसूल विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी.- प्रा. किशोर रिठे, पर्यावरणतज्ज्ञ, अमरावती

 मेळघाटचे डोंगर पोखरून पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण केला जात आहे.  बिनबोभाट होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीला महसूल विभागाने आळा घालणे गरजेचे आहे. - बन्सी जामकर, पंचायत समिती सभापती तथा पर्यावरण रक्षक 

महसूल विभाग गप्प का?- गौण खनिजाची परवानगी दिल्यावर नियमानुसार गौण खनिज नेले जात आहे की नाही, याच्या तपासाठीचे पथक नाममात्र ठरले आहे. - डोळ्यांदेखत दोनऐवजी तीन ते चार ब्रास गौण खनिज स्टोन क्रशर संचालक आणि तस्कर नेत असताना महसूल गप्प आहे. जीपीएस प्रणालीवरही मात आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास कशासाठी?

खदानीसाठीडोंगर पोखरून त्यातील मुरूम आणि दगड काढले जात आहेत. महसूल मिळविण्यासाठी या परवानग्या असल्या तरी गौण खनिज तस्कर आणि महसुलातील काही चोरट्यांच्या संगनमताने पर्यावरणाचा ऱ्हास आणि महसुलाची चोरी दोन्ही बाबी साधल्या जात आहेत.

घरे उभारण्यासाठीलहान शहराचे मोठ्या शहरात रूपांतर सुरू झाले आहे. अनेक शेतांमध्ये ले-आऊट टाकून प्लॉट आणि फ्लॅट विक्री होत आहे. मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यासाठी डोंगर पोखरून गौण खनिज नेले जात आहेत. कालपर्यंत पेरणी असलेल्या शेतात लगेच अकृषकची परवानगी मिळवून ले-आऊटचा व्यवसाय जोरात आहे. 

 

टॅग्स :mafiaमाफिया