शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

खबरदार ! कायदा हाती घ्याल तर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपी संजयकुमार बाविस्कर यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता, जनसामान्यांमध्ये विश्वास संपादन करू, त्यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीचे मिशन यशस्वी करू व गुन्हेगारीवर वचक ठेवू, असे ते म्हणाले. निवडणूक भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अंग आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : मिशन विधानसभा निवडणूक

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा शांततेत पार पाडली, सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखली, आता विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यास पोलीस सज्ज आहेत. निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे होण्यासाठी आता लक्ष केंद्रित केले आहे. कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग केल्यास गय केली जाणार नाही. कायदा हाती घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिला.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपी संजयकुमार बाविस्कर यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता, जनसामान्यांमध्ये विश्वास संपादन करू, त्यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीचे मिशन यशस्वी करू व गुन्हेगारीवर वचक ठेवू, असे ते म्हणाले. निवडणूक भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अंग आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम शांततेत पार पाडण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता, मतदान करावे. ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानीत राहत असल्याचा अभिमान बाळगून मतदान करा, असे आवाहन सीपी बाविस्कर यांनी केले आहे.सहावर एमपीडीए, दोनचा प्रस्तावलोकसभा, गणेशोत्सव, दुर्गात्सोव व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील सराईत व धोकादायक सहा गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस आयुक्तांनी स्वत:च्या नेतृत्वात आॅपरेशन राबवून आरोपींकडून नऊ देशी कट्टे व १३ जिवंत काडतूस जप्त केले. अमरावतीच्या इतिहासात ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे.२७ पथकांची करडी नजरशहरातील ७३५ बुथपैकी १७७ संवेदनशील आहे. निवडणूकीत फ्लार्इंग स्कॉड, व्हिडीओ सर्व्हेलन्स व एसएसटी असे २७ पथके २४ तास वाहनांची तपासणी करून घातक शस्त्रे, पैसे, अवैध दारूविषयी कारवाई करीत आहे. डीसीपी प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव नेतृत्वात तीन पथके सुध्दा सज्ज आहे.तडीपारांचे चेहरे ओळखागुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ९८ आरोपींना आतापर्यंत तडीपार केले आहे, तर १२ प्रस्ताव कारवाईच्या प्रक्रियेत आहे. त्यांची छायाचित्रे चौका-चौकात लावण्यात आले. तडीपार नजर चुकवून शहरात धुडघुस घालतात. त्यांची ओळख व माहिती नागरिकांना नसते. त्यांचे चेहरे व नावे जनसामान्यांना माहिती पडावे, यासाठी पोस्टर लावण्यात आले आहे. तडीपारांना ओळखून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले.पैशांच्या व्यवहारावर लक्षपैशांच्या व्यवहारावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. आचारसंहितेमुळे सद्यास असे प्रकार घडले नाही. कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुडंकर यांच्या ९३०९८३५३३१ यावर सपर्क साधावा.

टॅग्स :Amravatiअमरावती