खबरदार; नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:16 IST2021-08-28T04:16:40+5:302021-08-28T04:16:40+5:30

पान २ ची लिड पोलीस नेणार उचलून : सात महिन्यात ६६७९ वाहनचालकांच्या खिशाला चाट प्रदीप भाकरे अमरावती : जानेवारी ...

Beware; If you park in a no parking lot! | खबरदार; नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास!

खबरदार; नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास!

पान २ ची लिड

पोलीस नेणार उचलून : सात महिन्यात ६६७९ वाहनचालकांच्या खिशाला चाट

प्रदीप भाकरे

अमरावती : जानेवारी ते जुलै या सात महिन्यात एकूण ९२ हजार ४७१ वाहनचालकांकडून तब्बल ८५ लाख २३ हजार २०० रुपये असा बक्कळ दंड वसूल करण्यात आला. त्यात सर्वाधिक दंड भरला तो नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्यांनी. शहरातील नो पार्किंगस्थळी वाहने लावणाऱ्या ६ हजार ६७९ वाहनचालकांकडून तो दंड वसूल करण्यात आला. वाहतूक शाखेकडून नो पार्किंगमधील सरासरी ३१ वाहने दररोज उचलली जातात.

वाढती वाहन संख्या, अपुरी पार्किंगची व्यवस्था यामुळे अनेकदा नाईलाजाने अथवा चुकून नो पार्किंगमध्ये वाहने लावतात़. तेव्हा वाहतूक शाखेचे टेम्पो ही वाहने उचलून नेतात़. त्यावरून अनेक तक्रारी होत असतात़. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मोठा भुर्दंड बसतो. शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखा टेम्पोच्या मदतीने उचलतात़. ती शहरातील दोन वाहतूक विभागात आणली जातात़. तेथे वाहनचालकांकडून दंड व टेम्पोचा टोईंग खर्च वसूल केला जातो़. ही वाहने टेम्पोतील कर्मचारी एखाद्या टोळधाडीसारखी येऊन वाहन उचलतात़. वाहन उचलताना तशी कशीही उचलली जाते़. त्यातून अनेकदा वाहनांचे नुकसान होते़. यावरुन अनेकदा वादावादी होत असतात़. नो पार्किंगमधील वाहनचालकास २०० रुपये दंड ५० रुपये लिफ्टिंग चार्ज द्यावा लागतो.

////////महिना : वाहने

जानेवारी: १३०६

फेब्रुवारी : १२८४मार्च : १०४६

एप्रिल : ५१५मे : १०५

जून : १११५जुलै : १३०८

/////////////अशी आहे पोलिसांची भूमिका

रस्ता रहदारीसाठी असतो, वाहने उभी करण्यासाठी नव्हे. जेथे नो पार्किंग असा फलक नाही, तेथे वाहने उभी करण्यास परवानगी आहे, हा चुकीचा समज आहे. रस्त्याकडेला वाहने उभी करण्याची परवानगी द्यावी, की देऊ नये हे अधिकार मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक पोलिसांकडे आहेत. त्यामुळे जेथे रहदारीस अडथळा होणार नाही तेथे रस्त्याकडेला वाहने उभी करण्याची परवानगीची बाब पोलिसांकडे आहे.

/////////

कोट

शहरात पार्किंग, नो पार्किंग झोन दिसत नाहीत. अगदी बोटावर मोजण्याइतपत ठिकाणी ‘नो पार्किंग’ची फलके आढळतात. मग दुचाकी, चारचाकी लावायची तरी कुठे? याचे उत्तर स्थानिक स्वराज्य संस्था व वाहतूक विभागाने द्यावे.

- प्रणव तायडे, नागरिक, अमरावती

/////////////

Web Title: Beware; If you park in a no parking lot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.