आदिवासींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार!

By Admin | Updated: August 5, 2014 23:15 IST2014-08-05T23:15:12+5:302014-08-05T23:15:12+5:30

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, असा गर्भित इशारा देण्यासाठी आदिवासी समाजाचा येथील तहसील कार्यालयावर आज मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील तब्बल

Beware if tribal reservation will be handled! | आदिवासींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार!

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार!

इशारा : धामणगाव तहसील कार्यालयावर मोर्चा
धामणगाव (रेल्वे): आदिवासींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, असा गर्भित इशारा देण्यासाठी आदिवासी समाजाचा येथील तहसील कार्यालयावर आज मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील तब्बल चार हजार आदिवासी महिला-पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्च्याला स्थानिक शास्त्री चौक येथून सुरुवात झाली. टिळक चौक, मेनलाईन, गांधी चौक, अमर शहीद भगतसिंग चौक, कॉटन मार्केट चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला़ पोलीस प्रशासनाने कार्यालया बाहेरच हा मोर्चा अडविल्यानंतर अनेक मान्यवरांची भाषणे झालीत़ राज्य घटनेने गोंड धर्म आहे़ संस्कृती व गोंडी बोली भाषा आहे़ गोंड जमात आहे गोंडवाना साम्राज्य चालविणारे गौरवशाली महान गोंड राजा होवून गेले़
आज प्रत्येक आदिवासी आपल्या संघर्षासाठी लढा देत असतांना अनेक बोगस आदिवासी शासनावर दबाव टाकून आमच्या आरक्षणाला हात लावण्याचा प्रयत्न करीत आहे़ शासनाने आम्हाला सरंक्षण दिले नाहीतर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार असा ईशारा आर्वी ऩप़चे माजी नगराध्यक्ष महादेव धुर्वे यांनी दिला़ यावेळी जि़प़सदस्य सतीश उईके, रंजना उईके, बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष उत्तम मडावी, यच्छिद्र सयाम, जगदीश आत्राम, छगन कन्नाके, प्रभाकर खांडेकर, इरपाते, माणिक तोडसाम, मधुकर उईके, देवीदास मरसकोल्हे, अरूण धुर्वे, राजू मसराम, चंद्रकांत मडावी यांची भाषणे झालीत़ सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेक मान्यवरांनी या मोर्चाला मार्गदर्शन केले़ मोर्चात आदिवासी महिला, पुरूष आपल्या पारंपारिक वेषात सहभागी झाले होते़ तहसीलदार संजय गरकल यांना आदिवासी नेत्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Beware if tribal reservation will be handled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.