रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:08+5:302021-09-22T04:14:08+5:30

पान २ ची लिड असाईनमेंट अमरावती : दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत असून कोरोनाकाळात अनेकांचे खाण्याचेही वांदे झाले आहेत. ...

Beware if someone is arguing on the street for no reason! | रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

पान २ ची लिड असाईनमेंट

अमरावती : दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत असून कोरोनाकाळात अनेकांचे खाण्याचेही वांदे झाले आहेत. अशातच आता दादागिरीची क्रेझ असल्याने धारदार शस्त्र बाळगून वाहनाने फिरणाऱ्यांचे टोळकेही सक्रिय झाले आहे. दररोजचा खर्च भागविण्यासाठी लूटमारीसह चोरींचा पर्याय शोधून काढला आहे. अशातच काही रस्त्यांवर वाटसरूंना अडवून किंवा विनाकारण वाद निर्माण करून त्यांच्याकडून पैसे आणि महागड्या वस्तू हिसकावण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावर लूटमार करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. रस्त्यावर वाहनाचा धक्का लागला, वाहनांची धडक झाली यावरून विनाकारण वाद निर्माण करून समोरच्या व्यक्तीला धाकदपट करून पैसे उकळल्या जात आहे. यासोबतच महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रकार पथ्रोटजवळ उघड झाला होता. शहरात राजापेठ हद्दीतील एका हॉटेलजवळ हॉटेलमालक समजून एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला होता.

////////////////

अमरावती जिल्ह्यात घडले प्रकार

शहर तथा जिल्ह्यात विविध कारणांनी वाद निर्माण करून नंतर लुटल्याचे प्रकार घडले आहेत. चिखलदरा मार्गावर पर्यटकांना लुटण्यात आले होते. तर, कार अडवून एका डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यालाही मारहाणही झाली होती. यासंदर्भात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

——————

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते

१) अडवून ट्रकचालकाचा खून

सोयीबीनची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाचा खून करून चोरट्यांनी २५० क्विंटल सोयाबीनने भरलेला ट्रक पळविल्याची घटना ८ जून २०२१ रोजी सकाळी अमरावती ते मोर्शी मार्गावरील निंभी ते आसोना गावादरम्यान उघड झाली होती. नागरिकांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

////////////

२) रात्री ११.४५ च्या सुमारास एका हाॅटेलच्या चौकीदाराला जुन्या बायपासवर आठ ते नऊ जणांनी अडविले. चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील रोकडसह मोबाईल व दुचाकी हिसकावून ते पळून गेले. १० सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. आरोपींनी आपल्याला एअरगन दाखविल्याचेही तक्रारीत नमूद होते.

////////////////

ही घ्या काळजी

रस्त्याने जात असताना अनोळखी व्यक्तीसोबत संवाद टाळावा, गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू संभाळून ठेवाव्या, बँकेचे व्यवहार करताना योग्य खबरदारी घ्यावी. चोरी, लूटमारीसह सायबर गुन्ह्याच्याही घटना वाढल्या आहेत. यासाठी योग्य खबरदारी घेऊन सावधान राहणे हिताचे ठरते. पोलीस असल्याची बतावणीदेखील केली जाते. त्यापासून सजग राहण्याचे आवाहन राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी केले आहे.

Web Title: Beware if someone is arguing on the street for no reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.