ट्रक-एसटीच्या मधोमध आॅटोरिक्षा चेंदामेंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:53 IST2017-11-11T22:53:05+5:302017-11-11T22:53:32+5:30
येथील बस स्थानकाजवळ आज दुपारी अडीचच्या सुमारास ट्रक-एसटीच्या मधोमध आॅटोरिक्षा फसल्याने चेंदामेंदा झाली. या घटनेत जीवितहानी झाली नाही.

ट्रक-एसटीच्या मधोमध आॅटोरिक्षा चेंदामेंदा
ठळक मुद्देपरतवाडा : बसस्थानकाजवळ घटना, जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : येथील बस स्थानकाजवळ आज दुपारी अडीचच्या सुमारास ट्रक-एसटीच्या मधोमध आॅटोरिक्षा फसल्याने चेंदामेंदा झाली. या घटनेत जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, बस स्थानकासमोर एमएच २० बीएल १८१७ क्रमांकाची एसटी उभी होती. एमएच २७ पी ५८१२ क्रमांकाच्या आॅटोरिक्षाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी एमएच १४ डीएच ५९८५ क्रमांकाचा ट्रक येत होता. आॅटोरिक्षा बसच्या मधोमध असताना मागून येणाºया ट्रकचे ब्रेक लागले नाहीत. यामुळे आॅटोरिक्षा दोन्ही वाहनांच्या मधोमध अडकून चेपली. यावेळी वाहकाशिवाय अन्य प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली. अपघातामुळे वाहतूक खोंळबली होती.