शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

लाभार्थी गॅसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:38 IST

पीएम आवास योजनेतील सदनिका उभारणीच्या मार्गातील अडथळे वर्षभरानंतरही दूर होऊ न शकल्याने ८६० लाभार्थी गॅसवर आले आहेत. ४९ हजार रुपयांचा धनाकर्ष महापालिकेच्या नावे देऊन वर्ष लोटले तरीही यासंदर्भातील निविदा प्रक्रिया रखडलेलीच आहे. त्यामुळे या आठवड्यात सदनिका बांधणाऱ्या कंपनीवर शिक्कामोर्तब झाले तरी प्रत्यक्षात सदनिका बांधण्याचे व त्या घरात जाऊन राहण्याच्या सुखाचा अनुभव लांबणीवर पडला आहे.

ठळक मुद्देपीएम आवास योजना : डीडी परत घेण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीएम आवास योजनेतील सदनिका उभारणीच्या मार्गातील अडथळे वर्षभरानंतरही दूर होऊ न शकल्याने ८६० लाभार्थी गॅसवर आले आहेत. ४९ हजार रुपयांचा धनाकर्ष महापालिकेच्या नावे देऊन वर्ष लोटले तरीही यासंदर्भातील निविदा प्रक्रिया रखडलेलीच आहे. त्यामुळे या आठवड्यात सदनिका बांधणाऱ्या कंपनीवर शिक्कामोर्तब झाले तरी प्रत्यक्षात सदनिका बांधण्याचे व त्या घरात जाऊन राहण्याच्या सुखाचा अनुभव लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘भागीदारी तत्त्वावर परवडणाºया घरांची निर्मिती’ या घटक क्रमांक ३ अंतर्गत महापालिकेने ८६० घरांचा डीपीआर मान्यतेसाठी केंद्र व राज्यशासनाकडे पाठविला. विविध पातळ्यांवर त्या प्रस्तावाची तपासणी होऊन केंद्राने प्रस्तावास मान्यता दिली. त्यानंतर २०१७ च्या जुलैमध्ये ८६० घर बांधणीसाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. जागा निश्चित झाल्यात. सरतेशेवटी दोन निविदा आल्यानंतर तांत्रिक बिड उघडण्यात आली. मात्र, त्यात राजकारण शिरल्याने चार महिने तांत्रिक बिडमध्ये कुणाला बाद करायचे हेच प्रशासनाला ठरविता आले नाही. यात संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक निविदाधारकाने महापालिका प्रशासनाविरुद्ध आरोपही केला. मात्र त्यास न जुमानता स्थानिकाची निविदा तांत्रिक बिडमध्ये अपात्र ठरविण्यात आली. त्यानंतर मुंबईच्या कंपनीची फायनान्शियल निविदा उघडण्यासाठी प्रशासनाने पुन्हा दोन महिने घेतलेत. आयुक्त हेमंत पवार हे २८ मार्चला रुजू झाल्यानंतर फायनान्शियल लिफाफा उघडून मुंबईची 'गॅनान' कंपनीची निविदा पात्र ठरविण्यात आली.४ जानेवारी रोजी बिड उघडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर या योजनेच्या कर्त्याधर्त्यांना टेक्निकलचा तिढा सोडविता आलेला नव्हता. कालपरवा नीलेश असोसिएटची तांत्रिक निविदा अपात्र ठरवीत मुंबईच्या गॅनान कंपनीची एकमेव निविदा फायनान्शियलसाठी पात्र ठरविण्यात आली. मात्र, अद्यापर्यंतही त्या कंपनीशी वाटाघाटी करून निविदाप्रक्रिया अंतिम करण्यात आलेली नाही. सूत्रानुसार ‘गॅनान’ ही कंपनी सुमारे ८.५० लाख खर्चून ३० चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका बांधून देण्यास तयार आहे. मात्र, तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही बिडमध्ये पात्र ठरलेल्या या कंपनीशी वाटाघाटी करण्याचा मुहूर्त महापालिका प्रशासनाला अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे वाटाघाटी होऊन त्या कंपनीशी होणारा करारनामा, कार्यारंभ आदेश आणि प्रत्यक्षात कामास लागणारा वर्षभराचा कालावधी पाहता ८६० लाभार्थ्यांचे स्वप्न २०१९ मध्ये साकारणार की लांबणार, याबाबत कुणीही ठामपणे सांगू शकत नाही.असा आहे घटक क्रमांक ३भागिदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती या घटकाअंतर्गत ८६० घरांना मान्यता देण्यात आली. या घटकांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींकरिता शासकीय यंत्रणा व खासगी संस्थांशी भागिदारी करून घरकुलांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकल्पांकरिता केंद्र शासनाकडून प्रतिघरकूल १.५० लाख व राज्यशासनाकडून १ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या घटकाकरिता ३० चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंतचे घरकुले अनुज्ञेय आहेत.ज्या कंपनीची निविदा टेक्निकल व फायनान्शियल बिडमध्ये पात्र ठरली आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधींशी बुधवारी वाटाघाटी अपेक्षित आहेत. वाटाघाटीनंतरच निविदा प्रक्रियेला अंतिम रुप येणार आहे.- जीवन सदार, प्रभारी शहर अभियंता, महापालिका