थंंडीच्या गारव्यात मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:54 IST2019-01-07T00:52:52+5:302019-01-07T00:54:04+5:30

तिवस्याचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीला आ. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून इर्विन रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते रविवारी २३ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

Beetle boredom | थंंडीच्या गारव्यात मायेची ऊब

थंंडीच्या गारव्यात मायेची ऊब

ठळक मुद्देभैयासाहेबांच्या जयंतीचे निमित्त : यशोमती ठाकूर यांचा सामाजिक उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिवस्याचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीला आ. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून इर्विन रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते रविवारी २३ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल रुग्णाला या थंडीचा सामना करावा लागतो व रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातेवार्ईकांचीदेखील या थंडीमुळे गैरसोय होते.
ही बाब लक्षात ठेवून आमदार यशोमती ठाकूर यांचेद्वारा भैयासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम पार पडला. याच सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, टी.बी. हॉस्पिटल या ठिकाणीदेखील ११०० ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात व गरजूंनादेखील आ. यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्यावतीने ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जि.प. बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सुरेशराव साबळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, अंकुश जुनघरे, वीरेश साबळे, प्रद्युम्न पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Beetle boredom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.