अंजनगावात गोमांस विक्री करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST2021-09-27T04:14:30+5:302021-09-27T04:14:30+5:30

वनोजा बाग : शहरातील सुर्जी भागातील कुरेशीपुऱ्यात गोमांस विक्री पोलिसांनी पकडली. ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ ...

Beef seller arrested in Anjangaon | अंजनगावात गोमांस विक्री करणाऱ्याला अटक

अंजनगावात गोमांस विक्री करणाऱ्याला अटक

वनोजा बाग : शहरातील सुर्जी भागातील कुरेशीपुऱ्यात गोमांस विक्री पोलिसांनी पकडली. ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट व आय.एम. इनामदार, जमादार शेवतकर, कॉन्स्टेबल पंकज नळकांडे, सुनील चव्हाण, गोपाल पाटील, गोपाल सोळंके, विशाखा कैकडे, अर्चना यांनी सापळा रचून कुरेशीपुरा येथे आरोपी मोहम्मद जावेद अब्दुल शहीद (३९), मोहम्मद वसिम शेख कादर (३४) यांना गोमांस विक्री करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून एकूण २८ हजार ६०० रुपयांचे गोमांस जप्त करून आरोपींविरुद्ध कलम ५, ५ ब, ५ क, ९, ९ अ प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beef seller arrested in Anjangaon