शिक्षक व्हा, पण नोकरीची ‘नो गॅरंटी’
By Admin | Updated: June 25, 2014 23:32 IST2014-06-25T23:32:23+5:302014-06-25T23:32:23+5:30
शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या भावी शिक्षकांची संख्या रोडावली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा कल शासकीय

शिक्षक व्हा, पण नोकरीची ‘नो गॅरंटी’
खासगी क्षेत्राकडे कल : भावी शिक्षकांच्या प्रवेशाची संख्या रोडावली
अमरावती : शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या भावी शिक्षकांची संख्या रोडावली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा कल शासकीय क्षेत्रापेक्षा खाजगी शिक्षण संस्थाकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डी.एड.प्रवेश अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही नोकरीची 'नो गॅरंटी' असे समजावे लागणार आहे.
अध्यापक शिक्षण पदविका प्रथम वर्षाची प्रवेशासंदर्भात २ ते १६ जूनपर्यंत अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली. यादरम्यान अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १७ जूनपर्यंत ठेवण्यात आली होती. यंदापासून शासनाने आधी राज्यातील ३० टक्के कोट्यातील प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ७० टक्के कोट्यातील प्रवेश विभागीय स्तरावर केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. अमरावती विभागात यावर्षी ९ हजारांच्या जवळपास जागा उपलब्ध आहेत. मात्र आतापर्यंत १७३८ अर्ज प्रवेशाकरिता प्राप्त झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे दिवसेंदिवस अध्यापक शिक्षण पदविका प्रवेशाची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात २८ महाविद्यालंयात अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आहे. त्याप्रमाणे १७७६ जागा उपलब्ध आहेत. मात्र जिल्ह्यामधील महाविद्यालयांत प्रवेशाकरिता ५११ अर्ज आले असून अन्य जागांकरिता विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.