नावेडचे लौकवर्गणीतून सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST2021-08-25T04:17:07+5:302021-08-25T04:17:07+5:30
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील नावेड या गावाचे सौंदर्यीकरण लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. या अनुषंगाने रॉयल पाम या शोभायमान ...

नावेडचे लौकवर्गणीतून सौंदर्यीकरण
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील नावेड या गावाचे सौंदर्यीकरण लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. या अनुषंगाने रॉयल पाम या शोभायमान झाडाची रोपे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.
सरपंच संगीता धंदर, उपसरपंच दीपक नागे, ग्रामसेवक बी.पी. कदम यांनी लोकवर्गणीची संकल्पना मांडली. ग्रामस्थांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गटविकास अधिकारी एस.डी. काळे यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत, पोलीस पाटील संजय इंगळे, खोलापूरचे सरपंच आशुतोष देशमुख, वैभव डहाके, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू धंदर, कृषी सहायक ज्योती गिरी, समूह सहायक विष्णू वाकुडकर, तलाठी नीलेश क्षीरसागर, आरोग्य सेवक प्रवी निंभोरकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव डेहनकर, बिपीन शेंडे, लहानुजी थोरात, मीना धंदर, सविता धस्कट, अमोल नागे, सचिन मुरळे, रोजगार सेवक विवेक जुमळे, सचिन इंगळे, श्रीकृष्ण नागे, शुभम दामले, नीलेश नागे, नीलेश धंदर, राधेश्याम धंदर,
अरुण नितनवरे, जयेश नाकट, प्रवीण नागे, संदीप नागे, शुभम नागे, अनिरुद्ध इंगळे, अण्णाजी नितनवरे, रमेश नागे, गजानन ढोके, गौरव नागे, गौरव चक्रे, वैभव चहाकर, अतुल भटकर, सुधाकर इंगळे, वामन धंदर, राजू धंदर, सुभाष धंदर आदी उपस्थित होते.