पोलिसांना मारहाण, सीओंना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:40+5:30

मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली, तर पोलीस आल्यानंतर एक महिला पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी तिवसा बाजारओळील घडला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

Beating the police, insulting the CEOs | पोलिसांना मारहाण, सीओंना शिवीगाळ

पोलिसांना मारहाण, सीओंना शिवीगाळ

ठळक मुद्देतिवस्यात भाजीविक्रे त्याची अरेरावी : चौघांविरूद्ध गुन्हा, दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी असताना हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली, तर पोलीस आल्यानंतर एक महिला पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी तिवसा बाजारओळील घडला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
येथील बाजारओळमध्ये काही व्यवसायिक हातगाडीवर व्यवसाय करत असताना तिवसा मुख्याधिकारी पल्लवी सोटे व त्यांची चमू कारवाईसाठी सरसावली. त्यावेळी श्रीधर ढोले याने मुख्याधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. माहिती मिळताच तिवसाचे पीएसआय वर्षा वंजारी पथकासह तेथे पोहोचल्या. त्यानंतर ढोले कुटुंबातील अन्य सदस्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. यावर न थांबता श्रीधर ढोले हा वर्षा वंजारी व पोलीस कर्मचारी किसन धुर्वे यांच्या अंगावर धावून आला. यात धुर्वे जखमी झाले. पीएसआय वर्षा वंजारीया सुध्दा किरकोळ जखमी झाल्यात. मुख्याधिकाऱ्यांनी तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली.
श्रीधर तुकाराम ढोले, सुमित श्रीधर ढोले, मंगेश श्रीधर ढोले व वैष्णवी सुमित ढोले (रा.तिवसा) यांच्या विरुद्ध कलम ३५३, ३३२, ३५४, १८८, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

नियोजित जागेवर व्यवसाय न करणाऱ्यांना हटकले असता, ढोले यांनी कर्मचाºयांशी वाद घातला. त्यांनीच स्वत:चे कपडे फाडले. हातगाडीही उलटून दिली. पोलिसांना बोलाविले असता याने पोलिसांनाही मारहाण केली.
- पल्लवी सोटे, मुख्याधिकारी

Web Title: Beating the police, insulting the CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस