Beating a child for not working | काम न केल्याने मुलाला मारहाण

काम न केल्याने मुलाला मारहाण

अमरावती : दुकानात साखर आणण्यास सांगितले असता, मुलाने नकार दिल्यावरून एका महिलेने त्याला केस पकडून मारहाण केल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत जयसियाराम नगरात ९ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी तक्रारीवरून महिलेविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------

जमील कॉलनीत चोरी

अमरावती : नागपुरीगेट पोलीस ठाण्यांतर्गत जमील कॉलनीतील सरताज ट्रेडर्स पान मटेरीयल दुकानाचे शेटर तोडून सिगारेट व इतर साहित्य असा ४८,९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी रोशन अग्रवाल (३२, रा. पठाण चौक) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------------

कारच्या धडकेत इसम जखमी

अमरावती : फोनवर बोलत असलेल्या इसमाला कारने धडक दिल्याने तो जखमी झाल्याची घटना राहटगाव परिसरातील राजमाता कॉलनीत ७ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी प्रवीण माणिकराव श्रृंगारे (३२, रा. कांतानगर)विरुद्ध शनिवारी गुन्हा नोंदविला. अविनाश रामकृष्ण डकरे (४७, रा. राजमाता कॉलनी) यांनी तक्रार नोंदविली. जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Web Title: Beating a child for not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.