रस्त्याच्या कारणावरून भावाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST2021-07-05T04:09:25+5:302021-07-05T04:09:25+5:30

--------------------- शेतात दगड फेकल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग मंगरूळ चव्हाळा : शेजारच्या शेतात दगड फेकल्याचे आळ घेऊन वाद करणाऱ्या वडिलाची ...

Beating brother for road reasons | रस्त्याच्या कारणावरून भावाला मारहाण

रस्त्याच्या कारणावरून भावाला मारहाण

---------------------

शेतात दगड फेकल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

मंगरूळ चव्हाळा : शेजारच्या शेतात दगड फेकल्याचे आळ घेऊन वाद करणाऱ्या वडिलाची बाजू घेत सर्वांसोर महिलेची छेडखानी केल्याची घटना २ जुलै रोजी देऊळगव्हाण शिवारात घडली. महिलेच्या तक्रारीवरून मंगरूळ चव्हाळा पाेलिसांनी पांड्या ऊर्फ विष्णू रामराव सावध (२५, देऊळगव्हाण) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

अंजनगाव सुर्जी : माहेरहून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अमन राजेश शर्मा व एक महिला (दोन्ही रा. अहमदाबाद गुजरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------------

कुरेशीनगरातून दुचाकी लंपास

अंजनगाव सुर्जी : स्थानिक कुरेशनगरात घरासमोर उभी करून ठेवलेली एमएच २७ बीए ०८०५ क्रमांकाची अंदाजे ३० हजारांची दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली. मो. जुबेर वल्द अ. शाहीद (२२) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Beating brother for road reasons