अश्लील शिवीगाळ करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:35 IST2020-12-04T04:35:07+5:302020-12-04T04:35:07+5:30
------------------------------------------ संशयित आरोपी अटकेत अमरावती : अस्तित्व लपवून गुन्हा करण्याचा उद्देशाने रात्री फिरत असलेल्या युवकाला गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात ...

अश्लील शिवीगाळ करून मारहाण
------------------------------------------
संशयित आरोपी अटकेत
अमरावती : अस्तित्व लपवून गुन्हा करण्याचा उद्देशाने रात्री फिरत असलेल्या युवकाला गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. मोहित राजेश पोपटाणी (रा. रामपुरी कॅम्प), असे आरोपीचे नाव आहे.
-------------------------------------------------
विलासनगरात जुगार पकडला
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी विलासनगरात धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह १२६५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. प्रकाश देविदास धवणे (४२, रा. विलासनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------------------------
भातकुली नाक्यावर दारू पकडली
अमरावती : खोलापुरीगेट पोलिसांनी बुधवारी भातकुली नाक्यावर कारवाई करून ९३६ रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. आरोपी अब्दुल शरीफ अब्दुल रफीक (२९, रा. ताजनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.