उधारीचे पैसे मागितल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST2021-08-17T04:18:30+5:302021-08-17T04:18:30+5:30

शेतातील १२० फूट केबल लंपास वरूड : तालुक्यातील जरूड शिवारातून १२० फूट केबल अज्ञाताने लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट ...

Beaten for asking for loan money | उधारीचे पैसे मागितल्याने मारहाण

उधारीचे पैसे मागितल्याने मारहाण

शेतातील १२० फूट केबल लंपास

वरूड : तालुक्यातील जरूड शिवारातून १२० फूट केबल अज्ञाताने लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघड झाली. तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण

दर्यापूर : एकतर्फी प्रेमातून रनिंगला गेलेल्या तरुणीला मारहाण केल्याची घटना एका गावात १४ ऑगस्ट रोजी घडली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पाहुणे पाहणीकरिता आले असता, तू माझ्याशी बोलत जा, मला भेटत जा, अशी धमकी दिली. यावरून आरोपी ब्रजेश कुऱ्हाडे (२३, रा. माहुली धांडे) विरुद्ध दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------------

क्षुल्लक कारणावरून विळा मारला

मंगरुळ चव्हाळा : गाय बांधण्याच्या कारणावरून उदभवलेल्या वादात विळ्याने मारून जखमी केल्याची घटना पिंपळगाव निपाणी येथे १४ ऑगस्ट रोजी घडली. सुरेश लोणारे यांच्या तक्रारीवरून मंगरुळ पोलिसांनी नीलेश रामचंद्र ढोके (३४, रा. पिंपळगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

Web Title: Beaten for asking for loan money