सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:44+5:302021-08-27T04:17:44+5:30
श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा : वयानुसार प्रत्येक माणसाची झोपेची वेळ ठरली आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणाव, चिडचिड वाढते. ...

सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते
श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा : वयानुसार प्रत्येक माणसाची झोपेची वेळ ठरली आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणाव, चिडचिड वाढते. त्याचा विपरीत परिणाम शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर होतो. यातूनच गंभीर आजार होत असल्याचे हजारो उदाहरणे आहेत. किमान सहा तास झोप घेतलीच पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. झोप हेच रोगप्रतिकार शक्तीचे सूत्र तुमचे शरीर सदृढ ठेवते.
अलीकडच्या १५ ते २० वर्षांमध्ये अनेकांच्या कामकाज पद्धतीत मोठा बदल झाला आहे. व्यस्ततेमुळे झोपेकडे दुर्लक्ष होत आहे. पुरेशी झोप न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होत आहे. निरोगी आयुष्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. चुकीची लाईफ स्टाईल, खानपान प्रतिकारशक्ती कमजोर करते. ज्यांची झोप चांगली होते, ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असतात. अनेक लोक आहार व व्यायामासोबतच झोपेची वेळ तंतोतंत पाळतात. त्यामुळे अशा लोकांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असते. उपजत रोगप्रतिकार शक्ती असणे शरीर सुदृढतेसाठी फायद्याचे असते. सातत्याने अपुरी झोप होत असल्यास कालांतराने काही आजार जडण्यास सुरुवात होते. ताणतणाव, चिडचिड वाढते. त्यापासून शरीरामध्ये हार्मोन्सचा स्राव वाढतो, ज्यामुळे इम्युन सिस्टीम कमजोर होते. तेव्हा शरीर उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहा. झोपेलादेखील तेवढेच महत्त्व द्या, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.
--------------------------------
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
प्रत्येकाने संतुलित आहार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. आपल्याला रोगांपासून सुरक्षित राहता येते. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे आणि ऊर्जानिर्मिती संतुलित व सकस आहारातून मिळते. दुग्धजन्य पदार्थ ,फळे व पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, तृणधान्य व कडधान्य खाल्ले पाहिजे तसेच योगा, ध्यान, प्राणायामदेखील केला पाहिजे. संतुलित आहार आणि व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते.
---------------------------------
बॉक्स :
अपुऱ्या झोपेचे तोटे...
1) अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते. नैराश्य येते. रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यानंतर विविध आजार जडतात.
2) अपुरी झोप झाल्यास ॲसिडिटीचा त्रास, भूक न लागणे, हृदयविकाराचा झटका, हाय ब्लडप्रेशर, रक्तातील साखर वाढणे अशा आजारांना आमंत्रण देणारे ठरते.
3) अपुऱ्या झोपेचा परिणाम रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यासह तुमच्या पचनक्रियेवरही होतो.
--------------------------------
बॉक्स : संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
संतुलित आहार घेतल्यास प्रतिकारशक्ती मजबूत राहते. बऱ्याच रोगांपासून सुरक्षित राहता येते. त्याचप्रमाणे शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे व शरीरात ऊर्जानिर्मितीचे कामदेखील आहारातून मिळते. दुग्धजन्य पदार्थ, फळे, पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, तृणधान्ये व कडधान्ये खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर योगा, ध्यान, प्राणायामालादेखील मोठे महत्त्व आहे. शरीर सुदृढ राहते.
------------------------------