सावधान! फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:13 IST2021-09-21T04:13:59+5:302021-09-21T04:13:59+5:30

असाईनमेंट पान ३ ची लिड अमरावती : ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल स्टोअर्सकडून सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या सेल्स व ...

Be careful! Fraud can occur under the guise of a festival offer | सावधान! फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

सावधान! फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

असाईनमेंट पान ३ ची लिड

अमरावती : ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल स्टोअर्सकडून सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या सेल्स व फेस्टिव्हल ऑफरची घोषणा केली जाते. ४० ते ५० टक्के डिस्काऊंट, मोठ्या ऑफर, आकर्षक बक्षिसे अशी अनेक आकर्षणे यामध्ये असतात. मात्र, प्रत्यक्षात अनेकदा या अशा ऑनलाईन सेलमधून ग्राहकांना फसवणुकीचे अनुभवसुद्धा येतात. त्यामुळे डिजिटल व्यासपीठावर होणारे हे भव्य सेल खरोखरच सेल आहेत की फेल, असा प्रश्न निर्माण होतो.

बंपर ऑफर, मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट, स्वस्त किमती यांसारख्या गोष्टींनी लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच्या सेलकडे आकर्षित होतात. मात्र या ऑनलाइन शॉपिंगच्या पसाऱ्यात घेतलेल्या वस्तू घरापर्यंत पोहोचल्याच नाहीत, असा अनुभव कधी-कधी ग्राहकांना येतो. चुकीच्या प्रॉडक्टची डिलिव्हरी, आयत्या वेळी ऑर्डर रद्द होणे, शिपिंगला उशीर, कमी प्रतीचे प्रॉडक्ट असेही ग्राहकांचे अनुभव आहेत. ऑफर वेगवेगळ्या असल्या तरीही कोणतीही वस्तू विकत घेत असताना त्याची बाजारामध्ये किंमत काय आहे, त्याला मागणी किती आहे, ग्राहकांचे अभिप्राय कसे आहेत, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

////////////////////////////////

अशी होऊ शकते फसवणूक

१) एकीकडे सेलच्या निमित्ताने ५० ते ८० टक्के सवलत असल्याची जाहिरात करण्यात येत असली तरीही प्रत्यक्षात ज्या ब्रँडची मागणी कमी आहे, त्यांच्यावरच सवलत असल्याचा अनुभव ग्राहकांना येतो. अनेकदा ऑनलाईन नोंदविलेल्या उत्पादनाऐवजी दुसरीच वस्तू पाठविण्यात येते.

२) याचबरोबर अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची किंमत वाढवून त्यावर ५० टक्के सवलत असे काही वेबसाइट दाखवतात. प्रत्यक्ष बाजारात मात्र त्याच वस्तू कोणत्याही सवलतीशिवायसुद्धा त्याच दरात उपलब्ध असतात. अनेकदा कोड स्कॅन केल्यानंतर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.

/////////////

तक्रार करण्यासाठी पुढे या

ऑनलाईन शॉपिंग, फेस्टिव्हल ऑफर देणाऱ्या वेबसाइटमधील फसवणुकीसंदर्भातील बऱ्याच गोष्टी पुढे येतात. त्याबद्दल रीतसर तक्रारीची नोंदणी केल्यास त्याची छाननी करून कारवाई होऊ शकते. मोठ्या प्रमाणावरील जाहिरातबाजी, प्रसिद्धी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित कंपन्यांना ग्राहकांना वेळेवर सेवा पुरवणे अनेकदा शक्य होत नाही. यातूनच चुकीची डिलिव्हरी, उशिराने ऑर्डर मिळणे, डिफेक्टिव्ह ऑर्डर मिळणे यांसारख्या गोष्टी घडतात. याची ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते. प्रत्येक ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटची डिजिटल टीम असते. त्यांच्याकडे समाज माध्यमांच्या मदतीने तक्रार नोंदवा.

//////////

ही घ्या काळजी …

१) योग्य ब्रँड बघून आणि त्या वस्तूची दुकानातील खरी किंमत बघूनच खरेदी करा.

२) कंपनीच्या रिफंड पॉलिसीची माहिती घ्या.

३) तक्रार असल्यास कंपनीच्या हेल्प आणि सपोर्टकडे ती नोंदवा.

४) फेस्टिव्हल ऑफरमधील गोष्टींचा नीट अभ्यास करा.

५) त्यासंदर्भातील प्रतिक्रिया वाचून मगच मागणी नोंदवा.

Web Title: Be careful! Fraud can occur under the guise of a festival offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.