शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचे पडघम : भाजपची परीक्षा अन् नवनीत राणांची अग्निपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 10:27 IST

विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची नाराजी भोवणार, महाविकास आघाडीपुढे वज्रमूठ भक्कम ठेवण्याचे आव्हान

श्रीमंत माने/गणेश वासनिक

नागपूर/अमरावती : निवडून येताच हातावरचे घड्याळ उतरवून हिंदुत्वाचा अजेंडा राबविणाऱ्या खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांना मात्र नको आहेत. वरिष्ठ भाजप नेत्यांच्या गुडबुकमध्ये असल्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देतो की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतो, याची उत्सुकता आहे. त्यातच राणा यांनी ज्यांचा पराभव केला ते आनंदराव अडसूळ आता शिंदे गटात म्हणजे महायुतीच्या तंबूत आहेत. परिणामी, अमरावतीची उमेदवारी ही भाजपची परीक्षा असेल, तर नवनीत राणा उद्धव ठाकरे गटाच्या हिटलिस्टवर असल्याने येणारी निवडणूक त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीची जागा भाजप लढविणार असल्याचे जाहीर केले खरे. परंतु, मतदारसंघात पक्षाची आमदारकीची पाटी कोरी आहे. जिल्ह्यातील एकमेव भाजप आमदार प्रताप अडसड यांचा धामणगाव रेल्वे वर्धा लोकसभा मतदारसंघात आहे. येथील सहापैकी अमरावती (सुलभा खोडके), तिवसा (यशोमती ठाकूर) व दर्यापूर (बळवंत वानखडे) हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. बडनेऱ्यातून खासदारांचे पती रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार आहेत, तर अचलपूर (बच्चू कडू) व मेळघाट (राजकुमार पटेल) हे मतदारसंघ प्रहार जनशक्ती पक्षाकडे आहेत.

या परिस्थितीत पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा नवनीत राणा यांचा मनसुबा भाजपच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठीच चार वर्षांपासून राणांचा ‘भाजप जप’ सुरूच आहे. हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. त्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांना साथ असली तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या नको आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातींसाठी राखीव झालेली ही जागा दोनवेळा शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी जिंकली. गेल्यावेळी नवनीत राणा यांनी त्यांचा ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला. पण, शिवसेनेतील फूट व राज्यातील सत्तांतरात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या महायुतीत आहेत. म्हणजेच राणा व अडसूळ एका तंबूत आले आहेत.

अडसूळ पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांनी दावा केला, तर भाजपला ही जागा शिंदे गटाला सोडावी लागेल. तथापि, अमरावती जिल्ह्यात शिंदे गटाची फारशी ताकद नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवा चेहरा घेऊन लढावे लागेल. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण, राणा दाम्पत्याची तुरूंगवारी आदी कारणांमुळे अडसूळ यांच्यापेक्षा राणा यांच्यावर ठाकरे गटाचा राग अधिक आहे. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला सोडण्याची अजिबात तयारी नाही. उमेदवारीसाठी ज. मो. अभ्यंकर, दिनेश बुब, प्रवीण काशीकर आदींची नावे चर्चेत आहेत. सुषमा अंधारे यांना अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरूद्ध उतरवावे, अशी एक सूचना 'मातोश्री"वर पोहोचली आहे. तरीदेखील अमरावतीची जागा काँग्रेस लढवील आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे उमेदवार असतील, असे सुतोवाच ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीबाबत मौन बाळगले आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ २०१९ | २०१४

विधानसभा मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: मतदारसंघनिहाय मते : २०१४

विधानसभा : नवनीत राणा - आनंदराव अडसूळ : आनंदराव अडसूळ - नवनीत राणा

  • बडनेरा : ७६,०१० - ८६,४३९ : ९२,३६८ - ३४, ४४७
  • अमरावती : ९६, ६४४ - ६८, ८७६ : ७०, २७१ - ५७,३७३
  • तिवसा : ७६,५४७ - ७२,०३२ : ७८,९५२ - ४४,१६६
  • दर्यापूर : ८९,७९७ - ७८,६६२ : ८१,४६५ - ६३,६५९
  • मेळघाट : ९१,००८ - ७८,८६२ : ५८,२८५ - ७९,७८१
  • अचलपूर : ७७,८३८ - ८५,६७८ : ८४,०२२ - ४९,१३०

पोस्टल : ३१०३ - ३४४७ : १८४९ - ७२४

एकूण : ५,१०,९४७ - ४,७३,९९६ : ४,६७,२१२ - ३,२९,२८०

२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी ६५ हजार १३५ मते घेतली. त्याआधी देवपारे २०१४ ची निवडणूक बसपाकडून लढले व ९८ हजार २०० मते घेतली.

टॅग्स :Politicsराजकारणlok sabhaलोकसभाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAnandrao Adsulआनंदराव अडसूळAmravatiअमरावती