शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नावलीच्या आधारे ठरणार ग्रामविकासाची भावी दिशा

By admin | Updated: January 7, 2017 00:13 IST

पंचायत राज विभागाचा १० वर्षांसाठी दूरगामी आराखडा तयार करण्यासाठी बुधवारी झालेल्या...

पंचायत राज आराखड्यासाठी सभा : अधिकारी, पदाधिकाऱ्यांची जाणून घेतली मतेअमरावती : पंचायत राज विभागाचा १० वर्षांसाठी दूरगामी आराखडा तयार करण्यासाठी बुधवारी झालेल्या तज्ज्ञ गट समितीच्या बैठकीत प्रश्नावलीद्वारे पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. समितीच्या कार्यकक्षेत अंतर्भूत बाबींवर संबंधितांची मते जाणून घेण्यासाठी ही मार्गदर्शक प्रश्नावली होती. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायती त्यांच्याकरिता दोन स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, देशातील अनेक राज्यांत एकच कायदा आहे. राज्यात सध्याप्रमाणे दोन स्वतंत्र कायदे ठेवावेत की एकत्रितपणे तीनही स्तरावरील पंचायत राज संस्थांकरिता एकत्र अधिनियम असावा? सध्याच्या दोन्ही कायद्यात केवळ काही सुधारणा करून ते कायम ठेवावेत की मूलभूत नवीनच कायदे तयार करावे? केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने प्रस्तुत केलेला 'मॉडेल पंचायत अ‍ॅक्ट' हा जसाच्या तसा लागू करावा, की त्यात बदल करावा? अन्यथा महाराष्ट्राने स्वत:चा स्वतंत्र कायदा करावा काय? याविषयी मते तज्ञसमिती सदस्यांनी जाणून घेतली.भारतीय राज्यघटनेच्या ११व्या सूचीतील सर्व विषय पंचायती राज यंत्रणेकडे व प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडे सोपवावेत काय? ते ग्रामपंचायतींकडे देण्यासाठी राज्य शासनाने पंचायत राज कायद्यात व प्रशासकीय आदेशान्वये काय तरतूद कराव्यात, याविषयीची विचारणा प्रश्नावलीद्वारे करण्यात आली.राज्य घटनेत नमूद विषयाव्यतिरिक्त इतर कोणते विषय, कामे व सेवा पंचायती राज यंत्रणांकडे, विशेषत: ग्रामपंचायतींकडे सोपवावीत व त्यांचेसुद्धा पंचायत राज त्रिस्तरात कसे वाटप व्हावे. याबाबत देखील तज्ज्ञ गट समित्यांनी सूचना मागितल्या. ग्रामपंचायत स्तरावरील मनुष्यबळ व्यवस्था, त्यांच्यावरील नियंत्रण, नियुक्ती, नेमणूक पद्धत व वेतन व्यवस्था याविषयीच्या सूचना मागविण्यात आल्यात. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण, संनियंत्रण ग्रामपंचायतींकडेच निर्दिष्ट करण्याची गरज व या कर्मचाऱ्यांवर बांधिलकी कुणाची असावी व त्यांच्यावर कारवाई कुणी करावी, याविषयी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली. पंचायत निवडणुका पारदर्शक सर्व समावेशक करण्यासाठी, राज्य निवडणूक आयोगाची भूमिका, निवडणूक खर्चावर नियंत्रण तसेच उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक अर्हतेची आवश्यकता यावरदेखील सूचना मागविण्यात आल्यात. ज्वलंत प्रश्नांबाबत पंचायतींची भूमिका काय ?देशासमोरील ज्वलंत समस्या व गंभीर प्रश्नांबाबत ग्रामपंचायतींची भूमिका, बांधिलकी व जबाबदारी काय असावी, तसेच ग्रामस्वच्छता, जलसंधारण, कुपोषण प्रतिबंध निर्मूलन, पीक पद्धती, अतिक्रमणे, अवैध बांधकामे, वृक्षलागवड, वृक्षतोड नियंत्रण, शाळाबाह्य विद्यार्थी उपाययोजना, रोजगार संधी, सार्वजनिक मालमत्ता देखरेख दुरुस्ती, ग्रामसुरक्षा, हवामान बदल, ग्रामरस्ते, शेतरस्ते, अनिष्ट प्रथा निर्मूलन, ग्रामीण पणन स्थानिक बाजार विकास आदी विषयी पंचायत राज समिती तज्ञांनी मते जाणून घेतली.२०३० पर्यंत गाठावयाची उद्दिष्टेआंतरराष्ट्रीय स्तरावर २०१५ ते ३० या कालावधी पंचायतराज व्यवस्थेचा शाश्वत विकास साध्य करावयाचा आहे. यामध्ये गरिबीचे सर्वप्रकारे निर्मूलन, भूक व कुपोषण निर्मूलन, समान व सर्व समावेशक शिक्षण प्रणाली, लिंगभेद विरहित, पाणी व स्वच्छता उपलब्धता व त्यांचे शाश्वत व्यवस्थापन, आरोगयदायी जीवन, शाश्वत व आधुनिक ऊर्जेची उपलब्धता, भेदाभेद निर्मूलन, मनुष्यव्यवस्था समावेशक, हवामान बदल व त्यांचे परिणामी लढा देण्याची उपाययोजना, जलास्त्रोतांचे संवर्धन, जंगल बचाव व जमीन धृवीकरण उत्पादकता, हानी यावर उपाय आदी उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत.