सहा महिन्यात केळीचे भाव अर्ध्यावर; शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:57+5:30

शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की, कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्याच्याच परिणामी लॉकडाऊनच्या काळात तोडणी झालेल्या केळीचा शेतमाल शेतकऱ्यांकडे तुंबला. व्यापाऱ्यांनी या स्थितीचा फायदा घेऊन हा माल अत्यल्प दरात खरेदी केला आणि पिकविण्याची प्रक्रिया करून बाजारात नेला. दामदुपटीने विक्री होत असतानाही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दर दिला नाही.

Banana prices halved in six months; Hit the farmers | सहा महिन्यात केळीचे भाव अर्ध्यावर; शेतकऱ्यांना फटका

सहा महिन्यात केळीचे भाव अर्ध्यावर; शेतकऱ्यांना फटका

ठळक मुद्देन्यू नॉर्मल : ग्राहकांकडून मागणी नसल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी, उत्पादन वाढूनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : वर्षाच्या सुरुवातीला शेतकºयांच्या केळीला ११ ते १२ रुपये प्रतिकिलो असा दर होता. तीच केळी आता कोरोना संक्रमणकाळात अवघ्या सहा रुपये किलो दराने विकण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेचा मेळ न आल्याने शेतात पिकलेला माल बाजारात विकला गेला नाही. याशिवाय कोरोनाच्या धास्तीमुळे केळी खाण्याचे प्रमाणही कमी झाले होते. परिणामी केळीची मागणी घटली होती.
शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की, कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्याच्याच परिणामी लॉकडाऊनच्या काळात तोडणी झालेल्या केळीचा शेतमाल शेतकऱ्यांकडे तुंबला. व्यापाऱ्यांनी या स्थितीचा फायदा घेऊन हा माल अत्यल्प दरात खरेदी केला आणि पिकविण्याची प्रक्रिया करून बाजारात नेला. दामदुपटीने विक्री होत असतानाही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दर दिला नाही.
आता दुसऱ्या टप्प्यातील अनलॉकमुळे बाजारपेठ उघडल्या. वाहतूक सुरू झाली. तरीही व्यापारी वर्षाच्या सुरुवातीला असलेला ११ ते १२ रुपये किलो दराने केळी खरेदी न करता अवघ्या सहा रुपये दराने खरेदी करीत आहेत. पूर्वी चांदूर बाजार तालुक्यातील अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी बोटावर मोजण्याएवढे होते. आता मात्र तालुक्यात सिंचन व्यवस्था वाढली असून, केळी पिकाच्या क्षेत्रातसुद्धा वाढ झाली आहे. मात्र तालुक्यातील हजारो टन केळी बेभाव विकली जात आहे.

आम्ही रोखीचे पीक म्हणून केळीचे उत्पादन घेतो. त्यावर परिश्रम घेतो. यावेळी कोरोनाच्या नावावर केळीला भाव मिळाला नाही. भाव नसल्याचेच व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असलेली केळी केवळ ६०० रुपये दराने विकावी लागत आहे.
- प्रदीप बंड
केळी उत्पादक, जसापूर

बाजारात दुपटीचा भाव
शेतकऱ्यांकडून सहा रुपये किलोने खरेदी केलेल्या केळीची बाजारात १५ रूपये किलो दराने विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करताना केळी किलोप्रमाणे खरीदी केली जाते. मात्र तीच केळी बाजारात डझनाप्रमाणे विकली जाते. एक डझनमध्ये दोन ते अडीच किलो केळी बसतात. ही केळी ३० ते ४० रुपये किलो वा डझनाप्रमाणे विक्री केली जात आहे.

Web Title: Banana prices halved in six months; Hit the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी