उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:26 AM2019-05-17T01:26:02+5:302019-05-17T01:27:09+5:30

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Banana banana garden | उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

googlenewsNext
ठळक मुद्देतापमान ४३ अंशावर : सिंचन व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री बºयाच उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतात. केळी पिकांसाठी हे प्रतिकूल वातावरण आहे. पिकास पाणी दिले तरी फाटलेल्या पानांमुळे उन्ह थेट जमिनीवर पडत आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. भिजविलेली जमीन तात्काळ कोरडी होत आहे. केळी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही भागांत निसवण सुरू झाली आहे. परंतु, उन्हामुळे पाने होरपळून गेल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे.
ओलितासाठी जमिनीखाली पाणीच नसल्याने तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा धोक्यात आल्या असून, जवळपास एक महिना तापमानाचा वरवंटा शेष असताना आजच संत्राबागा व्हेंटिलेटरवर आहेत. भरपूर पाण्याची गरज पुरी होणार नसल्याने बहुतांश बागा संपणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .

‘मे’ च्या उत्तरार्धात उन्हाचे चटके तीव्र
यावर्षी बागांचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र समोर दिसत आहे. मेच्या उत्तरार्धात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवायला लागलेत. पाऊस यायला अद्यापही एक महिना शिल्लक आहे. आजच संत्राबागा पिवळ्या पडत आहेत. केळी हे पीक तर संवेदनशील आहे. या पिकाची उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागते. यावर्षी पाणीच नाही आणि वरून सूर्य आग ओकत आहे. यामुळे केळीच्या बागा नष्ट होणार असल्याचा धोका व्यक्त होत आहे.

१४ हजार हेक्टर क्षेत्रात ओलित
तालुक्यात पेरणीयोग्य असलेल्या ४२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १४ हजार हेक्टरवर ओलित आहे. देवगाव, खोडगाव, दहिगाव, चिंचोना, पळसखेळ, सावरपाणी, हिरापूर, कारला, तुरखेड या भागात संत्री, केळी व पानपिंपरी या पिकांच्या बागा आहेत. तीन वर्षांपासून पाऊस अत्यल्प झाल्याने भूपातळी कोरडीच राहिली. एखाद्या भागात पाणी असल्याचे समजताच त्या शेतकऱ्याला पैसे देऊन व तेथे बोअरवेल करून आठ ते दहा किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. जमिनीच्या पोकळीत असलेले पाणी संपले की, हेही थांबेल.

Web Title: Banana banana garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.