शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रोडगे, वांग्याची भाजी आणि हंडीचा सुगंध दरवळणार; अमरावती जिल्ह्यात बहिरम यात्रा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:27 AM

राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र्र चौधरी यांनी पूजा केल्यानंतर यात्रा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली.

ठळक मुद्देराज्यात सर्वाधिक काळ चालणारी यात्रा

आॅनलाईन लोकमतअमरावती: राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र्र चौधरी यांनी पूजा केल्यानंतर यात्रा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली. यासोबतच येथे रोडगे, वांग्याची भाजी व हंडीचा सुंगध दरवळण्यास सुरुवात झाली.परतवाडा-बैतुल आंतरराज्यीय महामार्गावर वसलेल्या बहिरमबुवा यात्रा २० डिसेंबरपासून सुरू झाली. ती ३१ जानेवारीपर्यंत चालाणार आहे. दरम्यान १० लाखांवर भाविक यात्रेत हजेरी लावणार आहेत. येथील बाजारात विविध सजावटी वस्तू, शेतीपयोगी साहित्य, कापड, मातीची भांडी, टुरिंग टॉकिज, झुले, आभुषणे, हॉटेल्स आदी दुकाने लागतील. अमरावती, परतवाडा, बैतुल, भैसदेही, अकोला, नागपूर, जळगावसह राज्याच्या विविध भागांतील भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत.

यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेची सभाबहिरम यात्रा राज्यासह मध्यप्रदेशात प्रसिद्ध आहे. पूर्वी कुटुंबासह बहिरमबुवासमोर नवस फेडला जात होता. येथे रोडगे, वांग्याची भाजी बनविण्याची प्रथा आजसुद्धा सुरू आहे. झेडपीची एक मासिक सभा आणि सामूहिक भोजन येथे सदस्य अधिकाऱ्यांसाठी दरवर्षी आयोजित केली जाते.

राहुटीसह मटणाची हंडीबहिरमबुवांचा प्रसाद मुरमुरे रेवडी फुटाणे असून यात्रेदरम्यान येथे किमान चार लाखांवर नारळ फुटतात. मात्र अनेक वर्षांपासून तेथे मातीच्या हंडीत मटणाचा स्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागरिक लिलावात जागा घेऊन त्यावर टेंट लाहून राहुटी उभारतात आणि दरदिवशी भाड्याने दिली जाते.बुधवारपासून बहिरम यात्रेला विधिवत पूजा अर्चा करून सुरुवात करण्यात आली. महिनाभर चालणाऱ्यां यात्रेत दहा लाखांवर भाविक येण्याचा अंदाज असून त्यासाठी मंदिर प्रशासनाने संपूर्ण तयारी चालविली आहे.विधिवत पूजनाने यात्रेला सुरुवातबहिरम यात्रेला बुधवारपासून विधिवत सुरुवात झाली. नऊ ब्राह्मणांच्या हस्ते अध्यक्ष सुरेंद्र चोधारी यांनी पूजाअर्चा केली. यावेळी संस्थानचे भास्करराव मानकर, प्रकाश ठाकरे, प्रेम चौधरी, किशोर ठाकरे, सुरेश ठाकरे, ड्रा. राजेश उभाड, अनिल कडू ,विठुभाऊ चिलाटे, अमर चौधरी पंजाबराव कविटकर आदी नागरिक, दुकानदार आदी उपस्थित होते.- सुरेंद्र चौधरी,अध्यक्ष, बहिरम संस्थान बहिरम

टॅग्स :cultureसांस्कृतिक