बडनेरा येथे सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण, पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:11+5:30
बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत पाचबंगला येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे अनेकांच्या नजरेत दुर्लक्षित असा वर्ग समजला जातो. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिका कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ही अद्वितीय ठरली आहे. नाल्यांची स्वच्छता, प्रभागातील साफसफाई, डास निर्मूलन फवारणी, जंतुनाशक फवारणीच्या कामी हे स्वच्छता कर्मचारी नागरिकांच्या नजरेत अग्रणी ठरले आहे.

बडनेरा येथे सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण, पूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्वच्छता कर्मचारी जिवाची तमा न बाळगता नियमितपणे स्वच्छतेची कामे करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे स्थानिक पाचबगंला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त महिला मंडळाने स्वंयस्फूर्तीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे औक्षण आणि पूजन करून त्यांचा सन्मान केला.
बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत पाचबंगला येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे अनेकांच्या नजरेत दुर्लक्षित असा वर्ग समजला जातो. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिका कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ही अद्वितीय ठरली आहे. नाल्यांची स्वच्छता, प्रभागातील साफसफाई, डास निर्मूलन फवारणी, जंतुनाशक फवारणीच्या कामी हे स्वच्छता कर्मचारी नागरिकांच्या नजरेत अग्रणी ठरले आहे. परिणामी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २२ मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिलांच्या पुढाकाराने गौरविण्यात आला. अनिल भालचक्र, मोहन गजभिये, मनोहर रंदळे, सोनाली भालचक्र, सुनंदा रंदळे, पूजा पाटील, रंजना धोत्रे, शोभा चोरआमले, अक्षिता भालचक्र, छाया धारगावे, ज्योती खरात, शोभा ढोके, सलोनी भालचक्र आदींनी सफाई कामगारांचे पूजन, औक्षण करून सन्मान केला. दरम्यान सफाई सुपरवायझर प्रवीण अडकणे यांच्याही सन्मान करण्यात आला.