परतवाड्यात पाच प्रतिष्ठाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:28 IST2019-07-18T23:28:29+5:302019-07-18T23:28:49+5:30
चोरांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालीत शहरातील पाच व्यापारी प्रतिष्ठाने फोडली. तेथील २ लाख ८० हजारांचा माल पळविला. चोरांच्या हैदोसाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

परतवाड्यात पाच प्रतिष्ठाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : चोरांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालीत शहरातील पाच व्यापारी प्रतिष्ठाने फोडली. तेथील २ लाख ८० हजारांचा माल पळविला. चोरांच्या हैदोसाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
परतवाडा शहरातील मुख्य मार्गावरील बैतूल स्टॉप आणि गुजरी बाजारातील राम किराणा, आयुष किराणा, सिद्ध साई किराणा, अमरदीप कापड दुकान आणि एका बीअर शॉपीचे शटर तोडून चोरांनी रोख रकमेसह माल लंपास केला. स्थानिक पोलिसांनी व्यापारी अजय चंदनानी (४८), प्रकाश चंदनानी (४०) व आनंद जयस्वाल (४३, सर्व रा. परतवाडा) यांच्या फिर्यादीवरून भादंविच्या ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. दोघांनी किरकोळ साहित्य गेल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले. परतवाडा शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. येथील दरोडा प्रकरणाचा तपास अद्यापही लागला नसताना रोज नवनवीन घटना घडत असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी चोरीचे सत्र तर थांबता थांबलेले नाही.