उत्तर प्रदेश सीमेवर बच्चु कडू यांचा ताफा रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:15+5:302020-12-11T04:39:15+5:30
बाहेरच्या पानासाठी फोटो पी १० चांदूर बाजार : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ...

उत्तर प्रदेश सीमेवर बच्चु कडू यांचा ताफा रोखला
बाहेरच्या पानासाठी
फोटो पी १०
चांदूर बाजार : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी धौलपूर सीमेजवळ रोखला. ना. कडू नवी दिल्लीत दाखल होऊ नये, म्हणून सर्व मार्ग पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी मोझरी येथून ४ डिसेंबर रोजी केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांसोबत दिल्ली येथे निघालेले बच्चू कडू यांनी ६ दिवसांत दुचाकीने १ हजार किलोमीटरचा प्रवास केला. मोझरी, चांदूर बाजारमार्गे परतवाडा, बैतुल, भोपाळ, गुणा, ग्वाल्हेर येथून भरतपूर पोहोचले. दररोज २०० किलोमीटरचा प्रवास करत कडू स्वत: दुचाकी चालवत आहेत.
ग्वाल्हेरमार्गे उत्तर प्रदेशमधील पलवल येथे जाण्यासाठी बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे यूपी पोलिसांनी कारण पुढे केल्याने पर्यायाने भरतपूरमार्गे ताफा नेण्यास सांगितले. परंतु भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग यूपी पोलिसांनी स्वत:हून बंद केल्याने भरतपूरलाच गुरुद्वारात कडू व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्काम करावा लागत आहे. या आंदोलनादरम्यान ना. कडू यांना जागोजागी जबरदस्त समर्थन मिळत आहे.