शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कडू-राणा वाद! प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या, काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार; कडू यांचा गौप्यस्फोट

By गणेश वासनिक | Updated: October 30, 2022 16:01 IST

राणा मुंबईला रवाना, मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी कडू रात्री ८ वाजता मुंबईसाठी निघणार

अमरावती : आमदार रवि राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद हा शिगेला पोहचला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या असून, काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार, असा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मी रात्री आठ वाजता मुंबईला निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र आमदार रवि राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे, मला असे वाटते आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला तर ठीक त्याने जे काही आरोप केले त्या संदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा समाधान झाले तर १ नोव्हेंबर रोजी ‘अल्टिमेटम’बाबतचा विचार करू आणि जे बदनामी केली आहे ते परत द्यावी, विषय संपला असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.आमदार रवी राणा मुंबईला रवानाआमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. राणा, कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिली आहे. त्यानुसार आमदार रवि राणा हे रविवारी सकाळी ९.२५ वाजताच्या सुमारास मुंबईला गेले आहेत. तर आमदार बच्चू कडू हे रविवारी रात्री ८ वाजता मुंबईला जातील, असे त्यांनी स्वत: सांगितले आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे