‘त्या’ बाळाच्या आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:36 IST2020-12-11T04:36:06+5:302020-12-11T04:36:06+5:30
अमरावती : न्यू प्रभात कॉलनीतील दीड महिन्यांच्या बाळाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आई नम्रता यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी ...

‘त्या’ बाळाच्या आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी
अमरावती : न्यू प्रभात कॉलनीतील दीड महिन्यांच्या बाळाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आई नम्रता यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतरही नम्रताने मुलाच्या हत्येची कबुली दिलेली नाही. त्यामुळे बाळाच्या हत्येमागचे गूढ अद्यापही कायम आहे.
न्यू प्रभात कॉलनीतील रहिवासी दिलीपसिंह चौहान यांच्या घरून त्यांची मुलगी नम्रता यांचे दीड महिन्यांचे बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार २९ नोव्हेंबर रोजी राजापेठ ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी घराच्या अंगणातील विहिरीतच बाळाचा मृतदेह आढळून आला होता. विहिरीवर लोखंडी जाळीचे आवरण असून, एका बाजुने छोटेशे दार आहे. सदर दार बाजुला करून बाळाला अलगद विहिरीत टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. परंतु, हे कृत्य करण्यामागे काय कारण दडले आहे, याचा उलगडा अद्यापही झाला नाही. दरम्यान, तपासात बाळाला काही आजार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे नम्रताने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतु, तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत तिने नन्नाचा पाढा वाचल्याने अद्याप तरी या धक्कादायक घटनेमागील गूढ उलगडलेले नाही, हे विशेष.