भयंकर! दिवसभरात १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:51+5:30
जिल्ह्यात २ एप्रिलला शहरातील हाथीपुरा भागात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल ४ एप्रिलला पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने हा जिल्ह्यातला पहिला संक्रमित रुग्ण अन् कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत या भागात ६ होमडेथ झाल्यात. या सर्व वयस्क व्यक्तींच्या मृत्यूपश्चात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

भयंकर! दिवसभरात १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताच आहे. या आठवड्यात संक्रमितांचे चार उच्चांक झाले असतानाच उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. दरम्यान, गुरुवारी १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आतापर्यंतही ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत तब्बल ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यत १७५ संक्रमितांचा मृत्यू झाला. हे प्रमाण आता २.३४ टक्क्यांपर्यत आहे.
जिल्ह्यात २ एप्रिलला शहरातील हाथीपुरा भागात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल ४ एप्रिलला पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने हा जिल्ह्यातला पहिला संक्रमित रुग्ण अन् कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत या भागात ६ होमडेथ झाल्यात. या सर्व वयस्क व्यक्तींच्या मृत्यूपश्चात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. महापालिका हद्दीत ऑगस्टपर्यंत झालेल्या संक्रमितांच्या मृत्यंूच्या कारणांचे पृथ:करण करण्यात आले असता सर्वाधिक मृत्यू ५० ते ७० या वयोगटातील रुग्णांचे व त्यांना कोरोनाच्या संसर्गासह इतरही आजार असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा २१ हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या सर्व ठिकाणी आयसीयूचे २०२ बेड, व्हेंटीलेटरसाठी १०५ बेड व ऑक्सीजनचे २०० बेडची सुविधा असल्याचे सांगण्यात आले. आता पीडीएमसी , सुपरस्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सीजन टँक लावण्यात येणार आहे.
सप्टेंबरच्या दहा दिवसात ४० रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. यामध्ये १ तारखेला मृत्यूची संख्या १३५ होती. यामध्ये ४ मृत्यू, २ तारखेला १ मृत्यू, ३ तारखेला ४ मृत्यू, ४ तारखेला ७ मृत्यू, ५ तारखेला ३ मृत्यू, ६ तारखेला ३ मृत्यू, ७ तारखेला ५ मृत्यू, ८ तारखेला २ मृत्यू, ९ तारखेला ३ मृत्यू व १० तारखेला १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या संक्रमितांची संख्या १७५ वर पोहोचली आहे.
अशी आहे गुरुवारची मृत्यू संख्या
जिल्ह्यात गुरुवारी ज्या १२ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये सर्वाधिक कमी २७ वर्षांचा युवक एसआरपीएफ कॅम्प येथील व सर्वाधिक वयस्क शोभा नगरातील ७३ वर्षाचे वृद्ध आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा येथे ५० वर्षीय, साईनगरात ७२ वर्षीय, भाजीबाजारात ६२ वर्षीय, रुख्मणी नगरात ६८ वर्षीय, कंवरनगरात ६७ वर्षीय, वरुड तालुक्यातील लोणी येथे ४८ वर्षीय, भातकुली येथे ६० वर्षीय व अमरनगरात ६१ वर्षीय पुरुष तसेच सोनल कॉलनीत ७० वर्षीय व रविनगरात ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.