आरोग्य वगळता अन्य कार्यालयांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:18+5:302021-05-11T04:13:18+5:30
जिल्हा परिषदेतील चित्र, १५ मे पर्यंत राहणार परिस्थिती कायम अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली ...

आरोग्य वगळता अन्य कार्यालयांना टाळे
जिल्हा परिषदेतील चित्र, १५ मे पर्यंत राहणार परिस्थिती कायम
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य, विभाग वगळता अन्य सर्व विभागांना सोमवारी टाळे लागले. ही परिस्थिती आठवडाभर कायम राहणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांची कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश सीईओ अविश्यांत पंडा यांनी दिले. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत विभाग यातून वगळण्यात आले आहेत. कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश असल्याने १० मे रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आदी विभाग सुरू होते. मात्र, बांधकाम, पशुसंवर्धन, सिंचन, महिला व बाल कल्याण, समाजकल्याण, वित्त, पंचायत, सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा व स्वच्छता, शिक्षण आदी विभागांना टाळे होते. त्यामुळे कार्यालयात ना खातेप्रमुख हजर होते, ना कर्मचारी.
जिल्हा परिषदेतील कार्यालये बंद असली तरी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या सूचना सीईओ अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत. यासोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
बॉक्स
ही कार्यालये राहणार सुरू
जिल्हा परिषद आरोग्य सेवा व ग्रामपंचायत आणि अत्याश्यक कार्यालये मात्र सुरू राहणार आहेत. दोन्ही यंत्रणा कोरोनाकाळात अतिशय महत्त्वाच्या असल्याने यामधून या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
बॉक्स
पदाधिकाऱ्यांचे दालनेही बंद
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत बहुतांश विभागाचे कार्यालय बंद ठेवले आहे. अशातच जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आदी पदाधिकाऱ्यांचे दालनालासुद्धा टाळे लागले होते.
कोट
झेडपी, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पंचायत हे विभाग वगळता, अन्य विभाग बंद ठेवले आहेत. मात्र, ॅ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कार्यालयप्रमुखासह त्याचे अधिनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपर्कात राहावे व भ्रमणध्वनी सुरू ठेवावे. आवश्यकता भासल्यास कार्यालयास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तथापि, कोणत्याही कारणास्तव संपर्कास प्रतिसाद न दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल
- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी