शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील एकाधिकारच्या १२ केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

गोरगरीब आदिवासींची फसवणूक होऊ नये, यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडील धान्याची खरेदी एकाधिकार योजनेंतर्गत केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून होणारी खरेदी आदिवासी विकास महामंडळाने यंदा सुरूच केली नाही. सर्व बारा केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे गावखेड्यात व्यापारी दर पाडून आदिवासींकडून शेतमाल खरेदी करून घेत आहेत.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळाची खरेदी बंदच : खेडा खरेदीत व्यापाऱ्यांकडून भाव पाडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गोरगरीब आदिवासींची फसवणूक होऊ नये, यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडील धान्याची खरेदी एकाधिकार योजनेंतर्गत केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून होणारी खरेदी आदिवासी विकास महामंडळाने यंदा सुरूच केली नाही. सर्व बारा केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे गावखेड्यात व्यापारी दर पाडून आदिवासींकडून शेतमाल खरेदी करून घेत आहेत.धारणी, चिखलदरा तालुक्यात एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींच्या सोयाबीन, गहू, चणा, तूर आदी शेतमालाची खरेदी करण्यात येते. त्यांची गैरआदिवासींकडून लूट होऊ नये, यासाठी बाजारभावानुसार ही खरेदी करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदिवासी विकास महामंडळाला खरेदीचे दर पाठवले जातात. त्यानुसार चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, हतरू, चुरणी, टेम्ब्रुसोंडा, अंबापाटी, चिखली तसेच धारणी तालुक्यातील बैरागड, चाकर्दा, हरिसाल, साद्राबाडी, कळमखार आणि धारणी अशा एकूण बारा केंद्रांवर ही खरेदी केली जाते. यंदा एकही केंद्र सुरू न झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे त्याचा गैरफायदा घेत व्यापारी कमी दरात धान्य खरेदी करीत आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने आदिवासींना रोजगाराअभावी आर्थिक चणचण जाणवू लागली. त्याचवेळी त्यांची लूट होत आहे.लॉकडाऊनमुळे खरेदी केंद्रे उघडण्यात आली नाहीत. ते संपल्यानंतर खरेदी केंद्रेसुद्धा सुरू करण्यात येणार आहेत.-गजानन कोटलावार,प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, धारणीकोरोनाचा धसका!सर्व देश २३ मार्चनंतर लॉकडाऊन झाला. मात्र, आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ऑक्टोबर महिन्यापासून बंदच आहे. सोयाबीननंतर आदिवासींचा गहू, चणा, तूर घरात पडून आहे. आता आदिवासी विकास महामंडळाने लॉकडाऊनची भीती पुढे केली आहे. प्रत्यक्षात कोरोनाची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून खरेदी व्यवहार सुरू करण्याची मागणी होत आहे.सोयाबीन गेले व्यापाऱ्यांच्या घशातआदिवासी विकास महामंडळांतर्गत मेळघाटातील या बाराही खरेदी केंद्रांमधून ऑक्टोबर ते ३० जूनपर्यंत आदिवासी शेतकºयांनी पिकवलेल्या धान्याची खरेदी केली जाते. मात्र, सात महिन्यांपासून खरेदी केंदे्र उघडण्यात न आल्याने संपूर्ण सोयाबीन खासगी व्यापाºयांच्या घशात गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या