७२ प्रकल्पांमध्ये सरासरी ५४ टक्केच जलसाठा
By Admin | Updated: July 20, 2014 23:57 IST2014-07-20T23:57:15+5:302014-07-20T23:57:15+5:30
पावसाच्या चार महिन्यांपैकी ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. सद्यस्थितीपर्यंत ३९० मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना केवळ १७० मि.मी.ची नोंद झाली आहे. परिणामी ओव्हरफ्लो होण्याऐवजी

७२ प्रकल्पांमध्ये सरासरी ५४ टक्केच जलसाठा
गजानन मोहोड - अमरावती
पावसाच्या चार महिन्यांपैकी ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. सद्यस्थितीपर्यंत ३९० मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना केवळ १७० मि.मी.ची नोंद झाली आहे. परिणामी ओव्हरफ्लो होण्याऐवजी जिल्ह्यातील एक मोठा, ४ मध्यम व ६७ लघु प्रकल्पात पूर्ण संचय पातळीच्या केवळ १८.३५ दशलक्ष घनमीटर इतकाच साठा शिल्लक आहे. ही सरासरी केवळ ५४ टक्के आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास या प्रकल्पातून रबी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त होईल. प्रकल्पांमधील जलसाठा फक्त पाणीपुरवठा योजनांसाठीच मर्यादित करावा लागेल. खंडित पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रबी हंगामासाठी ही धोक्याची घंटा आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यानंतर शहानूर, सपन, चंद्रभागा व पूर्णा हे चार मध्यम प्रकल्प आणि ६२ लघु प्रकल्प आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या लघु प्रकल्पातील जलाशयाची पातळी कमालीची घटली आहे. ८७३.२५ दशलक्ष घनमीटर इतक्या उपयुक्त साठ्याची गरज असताना केवळ १५४.६९ दशलक्ष घनमीटर साठा तूर्तास शिल्लक आहे.