करजगाव बस स्टॉपवरील ऑटो जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:35+5:302021-03-20T04:13:35+5:30

करजगाव : स्थानिक बस स्टॉपवर रात्रीच्या वेळी उभे असलेल्या तीन ऑटोरिक्षांना आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास ...

Auto burn at Karjagaon bus stop | करजगाव बस स्टॉपवरील ऑटो जळून खाक

करजगाव बस स्टॉपवरील ऑटो जळून खाक

करजगाव : स्थानिक बस स्टॉपवर रात्रीच्या वेळी उभे असलेल्या तीन ऑटोरिक्षांना आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. मोहसीन खान सलीम खान यांच्या मालकीचा एमपी ०४ आरबी २०३३, तन्वीर शाह जहागीर शाह यांचा एमएच २७ पी ७७५४ व वसीम खान सलीम खान यांचे आॅटो आगीत खाक झाले.

करजगावात ४५ आॅटोरिक्शा असून पैकी १० ते १५ आॅटो हे बस स्टॉप उभे केले जातात. गुरुवारचे मध्यरात्री तिन्ही आॅटो पेटविण्यात आल्याचे सकृतदर्शनी आढळले. घटनेची माहिती मिळताच शिरजगावचे ठाणेदार पंकज दाभाडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून आॅटो युनियनसोबत चर्चेत कुणावर संशय नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बस स्टॉपवरील एका खाजगी बँकेचे सिसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता रात्री अडीच वाजता दरम्यान एक अज्ञात व्यक्ती संशयीतरित्या आढळली. त्यादिशेने तपासाची चक्रे फिरली असून अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही.

---------

Web Title: Auto burn at Karjagaon bus stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.