खळबळजनक; अमरावती जिल्हा बँक घोटाळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 08:00 IST2021-09-19T08:00:00+5:302021-09-19T08:00:06+5:30
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी ३.३९ लाखांच्या दलालीप्रकरणी शनिवारी चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्या क्लिपची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

खळबळजनक; अमरावती जिल्हा बँक घोटाळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी ३.३९ लाखांच्या दलालीप्रकरणी शनिवारी चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्या क्लिपची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. (Audio clip of Amravati District Bank scam goes viral)
माजी आमदार वीरेंद्र जगताप व बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांना प्रत्येकी १५ लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे तसेच जिल्हा बँकेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील मोठ्या किमतीच्या गिफ्ट दिल्याचा यात उल्लेख आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने या क्लिपने खळबळ उडवून दिली आहे.
एकूण चार ऑडिओ क्लिप असून लाखो रुपये दलाली घेतल्याचे या क्लिपमधील संभाषणातून पुढे येते. या क्लिपमध्ये वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख व दलालांचे संभाषण असल्याचे म्हटले जात आहे. संचालकांनाही महागडे गिफ्ट दिले आहे का, अशी विचारणा क्लिपमध्ये होत आहे. ही क्लिप व्हायरल होण्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष उत्तरा जगताप, बबलू देशमुख यांना नोटीस बजावून उपस्थित राहण्याचे कळविले होते.