गं्रथदिंडी अन् मराठमोळ्या संस्कृतीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:50+5:30
स्थानिक नेहरू मैदानातून गंं्रथदिंडीला प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय, फेटेधारी मान्यवर मंडळी, टाळ-मृंदगांचा गजर, डीजेच्या तालावर युवक व युवतींचे नृत्य, नऊवारी पोषाख, तुतारीचा निनाद अशा अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन झाले. दुपारी ३ वाजता निघालेली ही दिंडी नेहरू मैदान, रेल्वे स्टेशन चौक, इर्विन चौक या मार्गाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी ५ वाजता पोहोचली.

गं्रथदिंडी अन् मराठमोळ्या संस्कृतीने वेधले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढलेल्या गं्रथदिंडीतील मराठमोळ्या संस्कृतीने अंबानगरीवासीयांचे लक्ष वेधले.
स्थानिक नेहरू मैदानातून गंं्रथदिंडीला प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय, फेटेधारी मान्यवर मंडळी, टाळ-मृंदगांचा गजर, डीजेच्या तालावर युवक व युवतींचे नृत्य, नऊवारी पोषाख, तुतारीचा निनाद अशा अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन झाले. दुपारी ३ वाजता निघालेली ही दिंडी नेहरू मैदान, रेल्वे स्टेशन चौक, इर्विन चौक या मार्गाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी ५ वाजता पोहोचली. गं्रथदिंडीत मायमराठीचा गजर करण्यात आला. गं्रथदिंडीत नामवंत लेखक, साहित्यिकांचे गं्रंथ ठेवण्यात आले. यावेळी रासेयो स्वयंसेवकांनी नृत्य सादर केले. ग्रंथदिंडी सांस्कृतिक भवनात दाखल झाल्यानंतर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता लेखक वि.स. जोग यांचे ‘मराठी भाषेची वाटचाल’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रफुल्ल गवई, मीनल ठाकरे, मनीषा काळे, स्मिता देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, वित्त व लेखा अधिकारी हेमंत कºहाड, मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे, हेमंत खडके, माजी कुलगुरू विलास सपकाळ, विलास नांदूरकर, मंगेश जायले, मंगेश वरखडे आदी उपस्थित होते.