पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST2021-05-01T04:12:10+5:302021-05-01T04:12:10+5:30

अमरावती : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका इसमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गुरुवारी ...

Atrocities on a woman living apart from her husband by showing the lure of marriage | पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

अमरावती : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका इसमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गुरुवारी नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी पोलीस पाटील राजू सदाशिव सोळंके (४४ रा. घोडसगाव) विरुध्द गुन्हा नोंदविला. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, सन २००६ मध्ये तिचे एका व्यक्तीसोबत लग्न झाले. तिला दोन मुली आहेत. परंतु, पती दारू पिऊन मारहाण करीत असल्यामुळे ती गेल्या वर्षभरापासून पतीपासून विभक्त राहते. दरम्यान तिचा नातेवाईक असणारा आरोपी राजू सोळंकेने आधार दिला. पतीपासून महिला दूर राहत असल्याची संधी साधून आरोपीने तिच्याशी लगट साधण्याचा प्रयत्न केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीन महिन्यांपासून ती महिला आरोपीसोबत राहत होती. परंतु आरोपीने लग्नास टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर पीडित महिलेने घटनेची तक्रार नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली.

Web Title: Atrocities on a woman living apart from her husband by showing the lure of marriage