एटीएममध्ये फाटक्या, जळालेल्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:17 IST2018-03-30T22:17:26+5:302018-03-30T22:17:26+5:30
शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून फाटक्या व जळालेल्या नोटा निघत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे एटीएममध्ये कचरा पडून असतानाही त्याची स्वच्छता केली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एटीएममध्ये फाटक्या, जळालेल्या नोटा
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून फाटक्या व जळालेल्या नोटा निघत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे एटीएममध्ये कचरा पडून असतानाही त्याची स्वच्छता केली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
परतवाडा शहरातील कश्यप पेट्रोल पंपमध्ये स्टेट बँकेचे एटीएम आहे. बुधवारी रात्री ८ वाजता भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे हे यांनी येथून १० हजार रुपये काढले. मात्र, एटीएममधून निघालेल्या ५०० तब्बल सहा हजारांच्या नोटा फाटक्या, जळलेल्या होत्या. त्यांनी बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
एटीएम की कचरा कुंडी?
परतवाडा शहरात विविध बँकांचे एटीएम सेंटर आहेत. मात्र, विदर्भ मिल कॉलनी स्टॉपवरील स्टेट बँकेच्या एटीएमसह अनेक बँकांच्या एटीएममध्ये कागदांसह इतर कचरा मोठ्या प्रमाणात आहे.
बँक बंद झाल्यावर एटीएम हा एकमेव पर्याय असताना, फाटक्या नोटा निघत आहेत. यापूर्वीदेखील असे प्रकार नागरिकांबाबत घडले आहेत.
- सुधीर रसे,
भाजप जिल्हा उपाध्यक्ष, पथ्रोट