मंथ एंडला अमरावती आगारातून वीस लालपरी धावणार बॅटरीवर

By जितेंद्र दखने | Published: March 6, 2024 10:00 PM2024-03-06T22:00:43+5:302024-03-06T22:00:52+5:30

६० बसेसची डिमांड : मध्यवर्ती बसस्थानकातील कामे शेवटच्या टप्यात

At the end of the month, twenty ST bus will run on battery from Amravati | मंथ एंडला अमरावती आगारातून वीस लालपरी धावणार बॅटरीवर

मंथ एंडला अमरावती आगारातून वीस लालपरी धावणार बॅटरीवर

अमरावती: जिल्ह्यात बसस्थानकांत इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन निर्माण केली जाणार आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अमरावती, परतवाडा, मोर्शी आणि वरूड या चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. जिल्ह्याला स्थानिक एसटी प्रशासनाने ६८ बसेसची मागणी केलेली आहे. यापैकी अमरावती आगारात लवकरच काम पूर्ण होणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून त्यानंतर या बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहेत. लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

प्रदूषणाला आळा अन् खर्चात बचत
वातावरणातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच इंधनावरचा खर्चाचा भार कमी करण्यासाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती विभागात ६८ बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २० बस मार्च एंडिंगपर्यंत अमरावती आगारात धावणार आहेत. यासाठी अमरावतीसह चार बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात चार्जिंग स्टेशनच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ५ हजार १५० पैकी पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. -नीलेश बिलसरे , विभाग नियंत्रक

तीन तासांत बसचे चार्जिंग
एक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तीन तासांचा अवधी लागेल. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यास हा कालावधी आणखी वाढू शकतो, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्जिंग केल्यास किमान तीनशे किलोमीटर धावेल. डिझेलच्या तुलनेत विजेवर होणारा खर्च कमी आहे. एवढेच नाही तर देखभाल दुरुस्तीचा खर्चही बराच कमी आहे.

अशी आहे बसच्या चार्जिंगची व्यवस्था
इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी जिल्ह्यात चार आगारात चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण प्रशासनाकडून उच्चदाब वीजपुरवठा घेण्यात येणार असून, या स्टेशनवरून बसेस चार्जिंग करण्यात येणार आहेत.

Web Title: At the end of the month, twenty ST bus will run on battery from Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.